New Car Launch: दिवाळीला SUV आणा दारात, सप्टेंबर महिन्यात 4 दमदार SUV होणार लाँच!
- Published by:Sachin S
Last Updated:
सप्टेंबर महिन्यापासून आता सण उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. जर तुम्ही एखादी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास आहे.
मुंबई : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून आता सण उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. जर तुम्ही एखादी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास आहे. कारण, सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकीसह इतर कंपन्या ४ अशा दमदार एसयूव्ही लाँच करणार आहे. मागील महिन्यात Volvo XC60 facelift आणि Mercedes AMG CLE 53 Coupe लाँच झाली आहे आता त्यात सप्टेंबर 2025 नवीन गाड्या लाँच होणार आहे.
मारुती सुझुकीसह Citroen, Vinfast आणि Volvo कंपनी आपल्या दमदार अशा कार लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. चार अशा गाड्या लाँच होणार आहे, ज्याचा तुम्ही एकदा विचार करू शकतात.
Maruti Suzuki ची नवीन SUV
Maruti Suzuki आपलीन Arena डीलरशीपची नवीन SUV 3 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. या SUV च्या लाँचनंतर Victoris असं नाव देण्याची शक्यता आहे. ही एक 5-सीट मिडसाइज एसयूव्ही असणार आहे. मार्केटमध्ये Hyundai Creta आणि Kia Seltos ला टक्कर देणार आहे. ही एसयूव्ही Grand Vitara पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये Grand Vitara चं 103hp, 1.5 लिटर इंजिन माइल्ड-हायब्रिड आणि 116hp स्ट्राँग-हायब्रिड इंजिन असा ऑप्शन दिला आहे. या एसयूव्हीमध्ये CNG चा सुद्धा ऑप्शन दिला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
Citroen Basalt X
Citroen कंपनी आता 5 सप्टेंबरला Basalt X लाँच करणार आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू आहे. 11,000 रुपये इतकी टोकन रक्कम देऊन ही कार बूक करू शकतात. यामध्ये कॉस्मेटिक आणि इक्विपमेंट अपग्रेड दिलं जाण्याची चिन्ह आहे. कंपनीने या कारची जो टीझर रिलीज केला आहे त्यावरून Basalt X च्या डॅशबोर्डवर नवीन पॅटर्न आणि नवीन ब्रॉन्ज एक्सेंट आणि इंटीरिअरमध्ये ब्लॅक आणि टॅन अपहोल्स्ट्री देण्याची शक्यता आहे. या शिवाय कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा सारखे फिचर्स दिले जाणार आहे. पण, यामध्ये आता फार असे कोणतेही बदल होणार नाही.
advertisement
Vinfast VF 6 आणि VF 7
व्हियातनामाची लोकप्रिय कंपनी Vinfast ने भारतात अखेर एंट्री केली आहे. Vinfast6 सप्टेंबर रोजी आपल्या २ कार लाँच करणार आहे. यामध्ये VF 6 आणि VF 7 या मॉडेलचा समावेश असेल. भारत-स्पेक VinFast VF7 7.2kW AC आणि CCS2 DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच 70.8kWh LFP बॅटरी दिली आहे, ज्यामुळे 450 किमी च्या जवळपास रेंज मिळण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 30 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
advertisement
तर दुसरीकडे, Vinfast कंपनीची VF6 ही दिसायला छोटी जरी असली तरी VF7 या मॉडेलसारखी दिसते. या कारमध्ये VF 7 सारखी टचस्क्रीन, सनग्लास रूफ आणि ADAS सारखे फिचर्स दिले आहे. पण या कारमध्ये 59.6kWh ची बॅटरी आहे, जी 204hp FWD मोटरला पॉवर देते. VF6 ची WLTP रेंज 480 किमी इतकी आहे. VF6 ची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. या कारची किंमत 20 लाख ते 25 लाख रुपयांच्याामध्ये असण्याची शक्यता आहे.
advertisement
Volvo EX30
view commentsजगातली सर्वात सुरक्षित कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Volvo ने आपली EX30 एसयूव्ही वरून पडदा बाजूला केला आहे. Volvo EX30 ची किंमत 50 लाख रुपयांच्या आसपास आहे. EX30 मध्ये 69kWh बॅटरी पॅक दिला आहे, ज्याची WLTP रेंज 480 किमी इतकी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 9:45 PM IST


