Maruti Baleno आणि Toyota Glanzaमध्ये कंफ्यूजन होतंय? जाणून घ्या तुमच्यासाठी कोण बेस्ट

Last Updated:

Maruti Suzuki Baleno स्वस्त, फीचर-रिच आणि फ्यूल एफिशिएंट आहे. तर Toyota Glanza प्रीमियम फील, चांगली रिसेल व्हॅल्यू आणि क्वालिटीसाठी पसंत केली जाते. चला जाणून घेऊया तुमच्यासाठी कोणतं ऑप्शन आहे बेस्ट.

मारुती सुझुकी बलेनो vs टोयोटा ग्लांझा
मारुती सुझुकी बलेनो vs टोयोटा ग्लांझा
Maruti Suzuki Baleno Vs Toyota Glanza: मारुती बलेनो आणि टोयोटा ग्लँजा, दोन्हीही भारतीय बाजारात प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटच्या प्रसिद्ध गाड्या आहेत. या दोन्ही कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार झाल्या आहेत. यामुळे यामध्ये इंजिन, फीचर्स, इंटीरियर स्पेस आणि परफॉर्मेंसमध्ये खुप समानता आहे.
तरीही काही अंतर आहे, जसं की, किंमत, ब्रँड व्हॅल्यू, सर्व्हिस नेटवर्क आणि किरकोळ डिझाइन अपडेट. तुम्हीही येत्या काळात एक प्रीमियम हॅचबॅक खरेदी करु इच्छित असाल आणि कंफ्यूज होत असाल की कोणती गाडी निवडावी, तर आज आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
किंमत
मारुती बलेनोची सुरुवात ₹5.99 लाख (सिग्मा पेट्रोल) पासून होते, तर टॉप व्हेरिएंट (अल्फा एएमटी किंवा रीगल एडिशन) ₹9.10 लाख ते ₹9.84 लाख, एक्स-शोरूम पर्यंत असते. टोयोटा ग्लांझा बेस व्हेरिएंटसाठी ₹6.39 लाख (ई पेट्रोल) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी (व्ही एएमटी) ₹9.15-10.00 लाख पर्यंत जाते. बलेनो ₹40,000 ते ₹60,000 पर्यंत स्वस्त आहे.
advertisement
डिझाइन 
एक्सटीरियर डिझाइविषयी बोलायचं झाल्यास, दोन्ही गाड्या खुप मिळत्या-जुळत्या आहेत. बलेनोमध्ये स्पोर्टी आणि मॉडर्न लूक आहे. यामध्ये शार्प LED हेडलाइट्स, क्रोम ग्रिल आणि रियरमध्ये कनेक्टेड LED टेललाइट्स मिळतात. तर ग्लँजामध्ये टोयोटाचा सिग्नेचर फ्रंट ग्रिल आहे. या जास्त प्रीमियम आणि सोबर वाटतात. दोन्हीमध्ये 16-इंच अलॉय व्हील्स, ग्लॉसी ब्लॅक एलिमेंट्स आणि स्पोर्टी सिल्ह्यूट आहे. एकूणच डिझाइन पर्सनल चॉइंसवर अवलंबून आहे.
advertisement
इंटीरियर(Interior)
दोन्ही मॉडेल्सचे इंटीरियर जवळजवळ सारखेच आहेत. त्यांच्याकडे प्रशस्त केबिन, चांगले फिटिंग आणि फिनिशिंग आणि प्रीमियम फील आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो), ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल (टॉप व्हेरिएंटमध्ये), पुश-बटण स्टार्ट, रिअर एसी व्हेंट्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री आहे. बलेनोची मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग आणि काही खास थीम्स अधिक आकर्षक आहेत. ग्लॅन्झाची इंटीरियर क्वालिटी थोडी चांगली वाटते. दोन्ही मॉडेल्समध्ये 318 लिटर बूट स्पेस आहे.
advertisement
फीचर्स (Features)
दोन्ही कार फीचर्सच्या बाबतीत पॅकेज्ड आहेत. ग्राहक त्यांना 360 डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले (बलेनोमध्ये) वायरलेस चार्जिंग, 6-स्पीकर ऑडिओ, ऑटोमॅटिक हेटलाइट्स आणि वायपरसह खरेदी करु शकता. सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स , ABS+EBD, ESP, हिल होल्ड, ISOFIX आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर/कॅमेरा सामिल आहे.
advertisement
इंजिन आणि मायलेज
दोन्ही मॉडेल्स एकाच 1.2-लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहेत. ही पॉवरट्रेन 88-89 bhp आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी (ऑटोमॅटिक) समाविष्ट आहे. पेट्रोलवर 22.94 kmpl आणि सीएनजीवर 30.61 km/kg इंधन कार्यक्षमता अंदाजे आहे.
Maruti Suzuki Baleno Vs Toyota Glanza: कोण बेस्ट? 
advertisement
तुमचे बजेट कमी आहे आणि जास्त फीचर्स + चांगले सर्व्हिस नेटवर्क हवे असेल तर Maruti Baleno बेस्ट चॉइस आहे. ही स्वस्त, फीचर-रिच आणि फ्यूल-एफिशिएंट आहे. तुम्ही टोयोटाचा रिलायबिलिटी, चांगली रिसेल व्हॅल्यू आणि थोडा प्रीमियम फील हवा असेल तर Toyota Glanza निवडू शकता.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti Baleno आणि Toyota Glanzaमध्ये कंफ्यूजन होतंय? जाणून घ्या तुमच्यासाठी कोण बेस्ट
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement