advertisement

Tata ने पुन्हा करून दाखवलं, Maruti ला दिला धक्का; टॉप 5 मध्ये टाटाची SUV नंबर 1 वर

Last Updated:

टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक एसयूव्ही विकण्याचा मान पटकावला आहे. टाटा मोटर्सच्या नव्या Tata Nexon ने बाजी मारली आली आहे. 

Tata Nexon 2026
Tata Nexon 2026
भारतामध्ये जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर SUV गाड्यांची विक्री वाढली आहे. कारच्या किंमतीत SUV उपलब्ध असल्यामुळे मध्यमवर्गीयांचा कल हा एसयूव्ही खरेदीकडे वाढला आहे. अशात टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक एसयूव्ही विकण्याचा मान पटकावला आहे. टाटा मोटर्सच्या नव्या Tata Nexon ने बाजी मारली आली आहे.  19,430 यूनिट्स विक्रीमुळे Tata Nexon ही नंबर १ एसयूव्ही ठरली आहे. तर Maruti Suzuki Dzire 19,326 ही यूनिट्स विकून दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, टॉप ५ एसयूव्ही विक्रीमध्ये एकट्या Maruti Suzuki Dzire सेडान कारने आपली जागा बनवून अजून सेडान कारचं पर्व संपलं नाही, हे दाखवून दिलं आहे.
नवी टाटा Punch
विक्रीमध्ये तिसऱ्या स्थानावर टाटा मोटर्सच्या नव्या  Tata Punch फेसलिफ्टने बाजी मारली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 18,748 यूनिट्सची विक्री करून Tata Punch तिसऱ्या स्थानावर आहे. Tata Punch च्या  फेसलिफ्ट मॉडेलमध्ये दमदार फिचर्स, नवीन लूक आणि CNG ऑटोमॅटिक हा पर्याय दिलाा आहे. त्यामुळे कारच्या विक्रीत वाढ झाली आहे.
Tata Punch EV Facelift
टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट
advertisement
Punch आता एक एंट्री लेव्हल SUV राहिली नाही, तर आता ती देशातील टॉप 3 एसयूव्हीमध्ये सामील झाली आहे.  'टाटाची Nexon पहिल्या क्रमांकावर आहे, तर Tata Punch दुसऱ्या स्थानावर आहे.
CRETA चा दबदबा कायम
तर चौथ्या स्थानावर दक्षिण कोरियन कंपनी  Hyundai ची Creta आपली जागा अजूनही बनवून आहे.  Hyundai Creta चे तब्बल 17,938 यूनिट्स विकले गेले आहेत. Creta आताही 4 मीटरपेक्षा मोठी असणाऱ्या SUV सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम राखून आहे.
advertisement
तर पाचव्या स्थानावर Maruti Suzuki Brezza आहे. फेब्रुवारी महिन्यात  Maruti Suzuki Brezza चे 17,863 च्या यूनिट्सची विक्री झाली आहे. फक्त पेट्रोल इंजिन असलं तरी  Brezza चा दबदबा कायम आहे.
SUV विक्री वाढली
दरम्यान, एसयूव्ही आणि ७ सीटर सेगमेंटमध्येही गाड्यांची विक्री वाढली आहे.  Maruti Suzuki Ertiga, Swift आणि Wagon R सारख्या गाड्यांची नेहमी सारखी विक्री आहे. सुझुकीकडे जास्त पर्याय असल्यामुळे विक्रीमध्ये नेहमी अव्वल राहिली. पण, टाटा मोटर्सने Tata Punch फेसलिफ्ट मॉडेल आणून मारुतीचा खेळ बदला आहे. आता टॉप 3 मध्ये Tata  मोटर्सच्याा दोन  SUV ने जागा मिळवली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीय आता ज्या गाडीची उंची जास्त आहे, मजबूत आहे, अशा गाड्यांना पसंती देत असल्याचं स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Tata ने पुन्हा करून दाखवलं, Maruti ला दिला धक्का; टॉप 5 मध्ये टाटाची SUV नंबर 1 वर
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement