केरळच्या या मंत्र्याला मिळाली Tata Sierra ची पहिली डिलिव्हरी! जाणून घ्या डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Tata Sierra Delivery: टाटा सिएगाची सध्या मार्केटमध्ये चर्चा सुरु आहे. अशातच केरळच्या मंत्र्याला टाटा सिएराची पहिली डिलिव्हरी मिळालीये. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. चाल पाहूया याविषयी सविस्तर...
नवी दिल्ली : टाटा मोटर्सची नवी कोरी SUV टाटा सिएराची डिलिव्हरी 15 जानेवारी 2026 पासून सुरु झाली आहे. आता देशभरात ग्राहकांना या गाडीची डिलिव्हरी दिली जातेय. विशेष म्हणजे केरळचे परिवहन मंत्री केबी गणेश कुमार राज्यात टाटा सिएरा खरेदी करणारे पहिले ग्राहक बनले आहेत. या डिलिव्हरीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आला व्हिडिओ
सोशल मीडिया प्लॅटपॉर्म इंस्टाग्रामवर गोकुलम मोटर्सकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. ज्यामध्ये केरळचे परिवहन मंत्री केबी गणेश कुमार आपल्या गाडीमधून उतरताना दिसत आहेत. नंतर ते आपल्या टाटा सिएराची डिलिव्हरी घेतात. यासोबतच मंत्र्याने केक कापून आनंदही व्यक्त केला आणि सिएराचा कव्हर हटवलं. गाडीची चावी मिळताच मंत्र्यांनी स्वतः ही एसयूव्ही चालवत बाहेर नेली.
advertisement
Tata Sierra चा पॉवरट्रेन
टाटा सिएराला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेन ऑप्शनसह मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. या कारमध्ये पेट्रोलमध्येही दोन इंजिन ऑप्शन मिळतात. गाडीमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन लावलेलं आहे. ज्यामुळे 160 PS ची पॉवर आणि 255 Nm चा टॉर्क मिळतो. या इंजिनसह 6-स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनही जोडलं आहे.
advertisement
टाटा सिएरामध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिनचा ऑप्शन देखील आहे जो 106 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क निर्माण करतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीए ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. नवीन एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिनचा ऑप्शन देखील आहे जो मॅन्युअल ट्रान्समिशनसह 118 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 280 Nm टॉर्क निर्माण करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 1:52 PM IST









