advertisement

बापरे! तब्बल 180 फुटांचा ट्रक, ऍव्हरेज आणि वेग पाहून बसेल धक्का, Video

Last Updated:

ट्रक महाकाय असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अडचणी येतात.

+
बापरे

बापरे ! तब्बल 180 फुटांचा ट्रक ! ऍव्हरेज आणि वेग पाहून बसेल धक्का, Video

धाराशिव, 20 नोव्हेंबर: तुम्ही एखाद्या महामार्गावरून जाताना माल वाहतूनक करणारे मोठमोठाले ट्रक पाहिले असतील. पण कधी तब्बल 180 फूट लांबीचा ट्रक पाहिलाय का ? तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल एवढ्या लांबीचा ट्रक कशासाठी असतो? या ट्रकचा स्पीड आणि ऍव्हरेज मायलेजबद्दल जाणून घ्यायलाही आपल्याला नक्कीच आवडेल. कर्नाटकातून पवनचक्कीची पाती घेऊन मध्यप्रदेशकडे जाताना हे ट्रक धाराशिवमध्ये आले आहेत. याबाबतच आपण माहिती घेणार आहोत.
180 फूट लांब विशालकाय ट्रक
भारतातील कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे पवनचक्कीचे पाते बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीत बनवलेली पवनचक्कीची पाती ही वाहून नेण्यासाठी विशालकाय ट्रक वापरला जातो. ट्रकची लांबी ही जवळपास 180 फूट इतकी आहे तर वाहून नेल्या जाणाऱ्या पवनचक्कीच्या पात्याची लांबी ही जवळपास 236 फूट इतकी आहे.
advertisement
महाकाय ट्रकबद्दल..
या महाकाय ट्रकसाठी इंधनही त्याच पटीत लागते. हा 180 फूट लांबीचा ट्रक एक लिटर डिझेलमध्ये एक किलोमीटर ते 1.6 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतो. हा ट्रक विंड ब्लेड म्हणजेच पवनचक्कीचे पाते वाहून नेण्यासाठी वापरला जातो. ट्रक महाकाय असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक कमी असताना म्हणजेच रात्रीच्या वेळीच प्रवास करतो. तर ट्रकचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असतो, असे चालक पांडे देवल सांगतात.
advertisement
ट्रकसोबत खास पथक
पवनचक्कीची पाती वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा महाकाय ट्रक रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करतो. त्यानंतर दिवशभर रस्त्याच्या कडेला उभा केला जातो. ज्यामुळे दिवसा प्रवासासाठी अडथळा निर्माण होणार नाही. तसेच या ट्रक सोबत एक एस्कॉर्ट पथक देखील असते. ट्रक ड्रायव्हर सोबत चार व्यक्ती सहायतेसाठी असतात. सकाळी सहा वाजता जिथे ट्रक उभा राहतो तिथेच गाडीतील सर्वजण जेवण बनवतात. आराम करतात आणि रात्री दहा नंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात करतात, असेही चालक सांगतात.
advertisement
ड्रायव्हरची तारेवरची कसरत
बेंगलोर ते मध्य प्रदेशातील धार इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी त्यांना 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. एकूणच 180 फूट लांबीचा महाकाय ट्रक चालवताना ट्रक ड्रायव्हर, सहाय्यक आणि एस्कॉर्ट पथक यांना तारेवरची कसरत करावी लागते.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
बापरे! तब्बल 180 फुटांचा ट्रक, ऍव्हरेज आणि वेग पाहून बसेल धक्का, Video
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement