दुचाकी चालकांना महामार्गावर खरंच टोल लागणार का? नितीन गडकरींनी दिलं थेट उत्तर

Last Updated:

सरकारने खासगी कारसाठी फास्टॅग टोलपास आणला आहे. दुचाकींसाठी टोल लागणार असल्याच्या अफवांवर NHAI ने स्पष्ट केलं की दुचाकींसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही.

News18
News18
खासगी कारसाठी टोल पास घेण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. आता टोलवर फास्टॅगने टोल भरवा लागत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी फास्टॅग टोलपास सरकारने आणला आहे. त्यानंतर आता दुचाकी गाड्यांसाठी देखील टोल लागणार असं बातम्या वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बाईक चालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. 15 जुलैपर्यंत फास्टॅग घेतला नाही तर 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असंही सांगितलं जात होतं.
हा मेसेज वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरत होता. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना महामार्गावर कोणताही टोल भरावा लागत नाही. मात्र या व्हायरल बातम्यांवर आणि मेसेजवर थेट NHAI ने महत्त्वाची सूचना दिली आहे.NHAI ने दुचाकीला टोल भरावा लागणार की नाही, फास्टॅग घ्यावा लागणार की नाही याचं उत्तर देखील ट्विट करून दिलं आहे.
advertisement
NHAI ने दिलं थेट उत्तर
NHAI ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याची योजना आखत आहे. NHAI स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे या केवळ अफवा आहेत. अशा अफवा किंवा मेसेज फॉर्वर्ड करण्याआधी सावध राहा, त्यावर विश्वास ठेवू नका अशा सूचना दिल्या आहेत.
advertisement
advertisement
फास्टॅग पास कोणासाठी?
फास्टॅग पास हा ज्या लोकांना राष्ट्रीय महामार्गावरुन किंवा एक्सप्रेस वे वरुन सतत प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. 200 ट्रिप त्यांना मिळणार आहेत. 3000 रुपये भरुन तुम्ही तेवढ्या ट्रिप पूर्ण करू शकता. 15 ऑगस्टपासून हा पास तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हा पास बंधनकारक करण्यात आलेला नाही. ज्यांना इच्छा आहे तेच घेऊ शकतात, अन्यथा ज्यांना टोल भरुन जायचं आहे ते टोल भरुन जाऊ शकतात. याशिवाय हा पास संपल्यानंतर तुम्ही दुसरा पास काढू शकता. एका वर्षात तुम्ही कितीही पास काढू शकता याची कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/ऑटो/
दुचाकी चालकांना महामार्गावर खरंच टोल लागणार का? नितीन गडकरींनी दिलं थेट उत्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement