सफाई कामगाराची एकच जागा, पण अर्ज केले 250 तरुणांनी, मास्टर डिग्रीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश

Last Updated:

सरकारी नोकऱ्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. मात्र, अशी नोकरी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्रता असलेला वर्गही अर्ज करताना दिसत आहे.

अर्ज केलेले उमेदवार
अर्ज केलेले उमेदवार
अनूप पासवान, प्रतिनिधी
कोरबा : एकीकडे देशामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. स्टार्टअप साठी तरुणांना सरकारच्या वतीने सहायता दिली जात आहे. मात्र, तरीसुद्धा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पण सर्वांनाच सरकारी मिळेल, असे चित्र नाही. यातच आता देशातील बेरोजगारांच्या परिस्थितीची चित्रण करणारी घटना समोर आली आहे.
कारण सफाई कर्मचारी या पदाच्या फक्त 1 जागेसाठी तब्बल 250 जणांनी अर्ज केले आहे. यामध्ये काही जण हे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे मास्टर डिग्री घेतलेलेही आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी स्तर आणि वेतनसाठी उच्च शिक्षणाचेही काही महत्त्व राहिलेले नाही असे दिसून येत आहे.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत बेरोजगारीवर निबंध लिहित आहेत. प्रत्येक निवडणुकीत बेरोजगारी हटवून रोजगार उपलब्ध करून देणे, हा राजकीय पक्षांसाठी सर्वात मोठा मुद्दा असतो. तर हाच मुद्दा मात्र मतदारांसाठी लॉलीपॉप ठरतो. याच जोरावर राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. मात्र, बराच काळ लोटला तरी बेरोजगारीचा मुद्दा हा काही निकाली निघत नसून उलट जास्त समस्या निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
advertisement
होळीच्या आधी शनि करणार कमाल, 4 राशीच्या लोकांना फायदा, नशिबच बदलणार…
काळानुसार सरकारी नोकऱ्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. मात्र, अशी नोकरी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्रता असलेला वर्गही अर्ज करताना दिसत आहे. सरकारी नोकरीचा शिक्का मिळावा, यासाठी अनेक जास्त शिकवलेले उमेदवारही अर्ज करत आहेत. सध्या छत्तीसगड म्युनिसिपल आर्मीने कोरबा जिल्ह्यात स्वच्छता कर्मचाऱ्याच्या एका रिक्त जागेसाठी अर्ज मागवले होते. पण यामध्ये तब्बल 250 जणांनी अर्ज केला.
advertisement
पाचवी पास पदासाठी मास्टर डिग्रीचे विद्यार्थ्यांचे अर्ज -
सफाई कामगार पदासाठी किमान पात्रता ही पाचवी पास उत्तीर्ण असे सांगितले होते. मात्र, कोरबा जिल्ह्यात पदव्युत्तर पदवीधारकही नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करत आहेत. यासाठी जिल्हास्तरावर वेतन दिले जाईल. होमगार्ड सेनानी पी. बी. सिदार यांनी सांगितले की, सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसह पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये त्यात पदव्युत्तर उमेदवारांचाही समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
सफाई कामगाराची एकच जागा, पण अर्ज केले 250 तरुणांनी, मास्टर डिग्रीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement