Sarkari Naukri AIIMS Recruitment 2024: 2 लाख पगाराची सरकारी नोकरी! घरबसल्या करा अर्ज; विविध पदांच्या 68 जागा

Last Updated:

Sarkari Naukri AIIMS Recruitment 2024: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे.

News18
News18
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी विलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अर्थात एम्स संस्थेत एक सुवर्णसंधी आहे. इथल्या फॅकल्टी पदांच्या रिक्त जागा 'एम्स' भरणार आहे. या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या ज्या इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल, त्यांनी 'एम्स'च्या ataiimsbilaspur.edu.inon या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. एम्स भरती 2024 साठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीच्या माध्यमातून एम्समध्ये एकूण 68 पदं भरली जाणार आहेत. या पदांशी संबंधित अर्हता तुमच्याकडे असेल तर 23 फेब्रुवारीपर्यंत किंवा यापूर्वीत या पदांसाठी अर्ज करा. एम्स भरती 2024 च्या या पदांकरिता अर्ज करण्यापूर्वी पुढे नमूद केलेल्या या गोष्टी लक्षपूर्वक वाचा.
'एम्स'मध्ये या जागांवर होईल प्रतिनियुक्ती
प्राध्यापक : 24 जागा
अतिरिक्त प्राध्यापक : 14 जागा
advertisement
सहयोगी प्राध्यापक : 14 जागा
सहायक प्राध्यापक : 16 जागा
'एम्स'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्हता आणि वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित अर्हता आणि वय असावं. तरच या पदासाठी अर्ज भरता येईल.
'एम्स'मध्ये निवड झाल्यावर मिळेल एवढं वेतन!
ज्या उमेदवारांची अंतिम निवड फॅकल्टी म्हणून होणार आहे, त्यांना जाहिरातीत उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्तरांनुसार वेतन दिलं जाईल. या संदर्भात पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
प्राध्यापक – पे मॅट्रिक्स 14 ए मूळ वेतन 1,68,900 रुपयांपासून 2,20,400 रुपयांपर्यंत
अतिरिक्त प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 13 ए2 मूळ वेतन 1,38,900 रुपयांपासून 2,11,400 रुपयांपर्यंत
सहयोगी प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 13 ए2 मूळ वेतन 1,38,300 रुपयांपासून 2,09,200 रुपयांपर्यंत
सहायक प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 12 मूळ वेतन 1,01,500 रुपयांपासून 1,67,400 रुपयांपर्यंत
advertisement
अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी लिंक : https://aiimsbilaspur.edu.in/recruitment
कसा कराल अर्ज?
या पदांसाठी अर्ज करण्याकरिता 'एम्स'च्या aiimsbilaspur.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. ज्या ठिकाणी एम्स विलासपूर भरती 2024 असं लिहिलं असेल, त्या लिंकवर क्लिक करा.
advertisement
आवश्यक तपशील भरावेत. अर्ज पूर्ण भरावा. पदांसाठी आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत. पूर्ण अर्ज भरून सबमिट करावा. भविष्यातल्या संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून घ्या.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Sarkari Naukri AIIMS Recruitment 2024: 2 लाख पगाराची सरकारी नोकरी! घरबसल्या करा अर्ज; विविध पदांच्या 68 जागा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement