UP Board 10th 12th Result: अखेर बोर्डाचा लागला निकाल, मुलींनी मारली बाजी, हा विद्यार्थी ठरला पहिला!
- Published by:sachin Salve
Last Updated:
UP Board Toppers List Declared:101 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. दहावीचा निकाल 89.55 आणि 12 वीचा निकाल 82.60 टक्के लागला आहे.
मागील वर्षी 2023 चा निकाल हा 89.78 टक्के लागला होता. 2023 मध्ये उच्च माध्ममिक परिक्षेचा निकाल 75.52 टक्के लागला होता. तर 2022 मध्ये परिक्षेचा निकाल 88.18 टक्के लागला आहे. या वर्षी दहावीच्या परिक्षेला 1 लाख 84 हजार 986 आणि उच्च माध्यमिकमध्ये 1 लाख 39 हजार 022 असे एकूण 3 लाख 24 हजार 08 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यावर्षी यूपी बोर्डाची परिक्षा 22 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान 12 दिवस परिक्षा आयोजित केली होती. जवळपास 2 कोटी 85 लाख पेपरांचं मुल्यांकन 16 मार्च ते 30 मार्चदरम्यान करण्यात आलं.
advertisement
बारावीच्या परिक्षेत शुभम वर्मा पहिला
यूपी बोर्डाच्या परिक्षेत सीतापूरची प्राची निगम ही पहिली आली आहे. तर 12वीच्या परिक्षेत शुभम वर्मा अव्वल ठरला आहे.
UP Board 10th Result 2024 upmsp.edu.in: यूपी बोर्ड माध्यमिक टॉपर लिस्ट 2024
1- प्राची निगम
2- दीपिका सोनकर
3- नव्या सिंह
4- स्वाती सिंह
5- दिपांशी सिंह सेंगर

advertisement
UP Board 12th Result 2024 @ upmsp.edu.in: यूपी बोर्ड उच्च माध्यमिक टॉपर लिस्ट 2024
1- शुभम वर्मा- सीतापूर
2- विशु चौधरी- बागपत
3- काजल सिंह- अमरोहा
4- राज वर्मा – सीतापुर
5- कशिश मौर्या- सीतापुर
6- चार्ली गुप्ता- सिद्धार्थनगर
7- सुजाता पांडेय- देवरिया
इथं पाहा यूपी बोर्डाचा निकाल
view commentsनिकाल जाहीर झाल्यानंतर यूपीबोर्डाची साईड क्रॅश झाली. पण आता ती पूर्वपदावर आली आहे. निकाल हा upmsp.edu.in आणि upresults.nic.in वर पाहू शकतो.
Location :
Uttar Pradesh
First Published :
April 20, 2024 4:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
UP Board 10th 12th Result: अखेर बोर्डाचा लागला निकाल, मुलींनी मारली बाजी, हा विद्यार्थी ठरला पहिला!


