पतीचं निधन, एका घटनेनं बदललं आयुष्य; झोपडपट्टीतील मुलांना कशी भेटली विद्येची देवता?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Inspiring Story: छत्रपती संभाजीनगर येथील एक महिलेने खास व्रत हाती घेतलंय. बेरील सांचीस या झोपडपट्टीतील मुलांना मोफत शिकवत आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: समाजात असे काही घटक असतात ज्यांच्या परिस्थितीमुळं मुलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीत. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांपासूनही हे लोक खूप दूर असतात. अशाच झोपडपट्टीतील चिमुकल्यांना शिकवण्याचं काम छत्रपती संभाजीनगरमधील बेरील सांचीस ही महिला करतेय. गेल्या काही वर्षांपासून स्वखर्चाने त्यांचा हा ज्ञानदानाचा यज्ञ सुरू असून झोपडपट्टीतील काही मुले उच्चशिक्षणापर्यंत पोहोचली आहेत. त्यांच्या याच कार्याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
बेरील सांचीस या छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये राहतात. त्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी देखील करतात. झोपडपट्टीतील गोर-गरीब मुलांना शिकवण्याचं काम त्या गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. “जेव्हा माझ्या पतीचं निधन झालं, तेव्हा मी खूप खचून गेले होते. मला काय करावं? काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी सतत देवाला दोष द्यायचे. पण एक दिवस मला देवाने सांगितलं की, तुझ्याकडे तर सर्व आहे. पण तू इतरांसाठी काहीतरी करू शकते. तेव्हापासूनच मी ठरवलं की आपण देखील काहीतरी देण्याचं काम करायचं,” असं बेरील सांगतात.
advertisement
एका घटनेनं बदललं आयुष्य
बेरील पुढे सांगतात की, “मी ऑफिसला जात असताना एकदा सिग्नल वरती काही मुलं भीक मागताना दिसली. मी त्या मुलांना विचारलं की, तुम्ही भीक का बर मागता? तुम्ही शाळेत का जात नाही? तेव्हा त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. त्यानंतर मी त्या मुलांच्या वस्तीमध्ये गेले. त्यांच्या आई-वडिलांसोबत बोलले. त्यांच्या आई-वडिलांनी सांगितलं की, आम्ही गरीब आहोत. आमच्याकडे एक वेळच्या खाण्यासाठी देखील पैसे नसतात. आम्ही आमच्या मुलांना शिकवणार तरी कसं? पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलले त्यांना समजावून सांगितलं.”
advertisement
सुरुवातीला पालकांचा विश्वास नव्हता
सुरुवातीला या पालकांचा बेरील यांच्यावर विश्वास नव्हता. तेव्हा त्यांनी मुलांना त्यांच्यासमोरच शिकवण्याची अट घातली. पुढे हळूहळू त्यांच्यावरती विश्वास बसायला लागला. आता त्या दर रविवारी वस्ती वरती जाऊन मुलांना शिकवण्याचं काम करतात. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी आता बारावी पास देखील झालेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण त त्यांचा शाळेत प्रवेश देखील करून दिला आहे. गेल्या 8 वर्षांपासून हे काम सुरू असून पुढे देखील शिकवण्याचं कार्य सुरूच ठेवणार असल्याचंही बेरील सांचीस सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 21, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
पतीचं निधन, एका घटनेनं बदललं आयुष्य; झोपडपट्टीतील मुलांना कशी भेटली विद्येची देवता?