दहावी-बारावी झालीय, पण करिअर कोणतं निवडायचं? गोंधळात पडू नका, फाॅलो करा 'या' 5 टिप्स, अचूक निर्णय घ्याल!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर करिअर निवडीचे मोठे आव्हान असते. योग्य करिअर निवडली नाही तर भविष्यातील संधी कमी होऊ शकतात आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या आवडी, कौशल्ये आणि...
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की, विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहतं, ते म्हणजे योग्य करिअर निवडण्याचं. आजकालच्या जगात पूर्वीसारखे मर्यादित पर्याय राहिलेले नाहीत, उलट विद्यार्थ्यांसाठी खूप सारे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल अनेक शक्यता शोधायला मिळतात. पण ही विविधता कधीकधी गोंधळ निर्माण करते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आणि समजूतदारीने निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे. जर करिअरची निवड चुकली, तर वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता असते, आणि आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
सगळेच पर्याय चांगले, पण आपले मन कशात रमते?
दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना अचानक हजारो करिअरचे पर्याय दिसू लागतात. कोणत्या क्षेत्रात जावं, काय करावं, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात. पण अशा वेळी आपली आवड आणि त्या करिअरमध्ये लागणारी कौशल्ये यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अनेकदा समाज आणि नातेवाईकांच्या दबावामुळे मुले चुकीचे करिअर निवडतात. त्यामुळे करिअर निवडण्यापूर्वी खालील मुद्दे नक्की वाचा.
advertisement
करिअर निवडण्यापूर्वी हे नक्की वाचा!
तुमची आवड, क्षमता आणि निवड गांभीर्याने समजून घ्या : विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे विषय कोणते आहेत, आपली क्षमता कशात आहे आणि आपल्याला काय करायला आवडते हे शांतपणे विचारून ठरवावे. समाजात काय चालले आहे किंवा लोकांचा काय दबाव आहे, याखाली कोणताही निर्णय घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करिअर निवडले, तर भविष्यात तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही, ताण येणार नाही आणि तुम्ही आनंदी राहाल. आपल्यातील ताकद, कौशल्ये आणि वैशिष्ट्ये ओळखल्याने आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळवणे सोपे जाते.
advertisement
नवीन संधी ओळखा : तंत्रज्ञानाचा विकास आणि जागतिक पातळीवर होणारे बदल यामुळे अनेक नवीन करिअरचे पर्याय समोर येत आहेत. विद्यार्थ्यांनी अशा क्षेत्रांचा शोध घ्यावा ज्यात भविष्यात जास्त संधी असतील. नवीन उद्योग, मागणी असलेली कौशल्ये आणि बदलत्या नोकरीच्या बाजाराबद्दल माहिती ठेवल्यास योग्य करिअर निवडायला मदत होते.
फक्त डिग्री नव्हे, कौशल्येही महत्त्वाची : आजकाल फक्त शिक्षण पदवी असून चालत नाही, तर व्यावसायिक कौशल्ये आणि प्रशिक्षण घेणेही खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरच्या पर्यायांमध्ये अशा क्षेत्रांना प्राधान्य द्यावे जिथे त्यांना नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःला अपडेट ठेवण्याची संधी मिळेल. सतत नवीन गोष्टी शिकत राहणे ('अपस्किलिंग') आणि आवश्यकतेनुसार कौशल्ये बदलणे ('रीस्किलिंग') यामुळे करिअरमध्ये प्रगती करण्याची शक्यता वाढते.
advertisement
आर्थिक बाजूचाही विचार करा : करिअर निवडताना आर्थिक दृष्टीने विचार करणेही खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी हे पाहावे की ज्या क्षेत्रात त्यांना जायचे आहे, त्यात भविष्यात आर्थिक स्थिरता किती मिळू शकते. योग्य करिअर निवड म्हणजे फक्त मोठा पगार शोधणे नव्हे, तर एक संतुलित आणि सुरक्षित भविष्यची योजना करणे होय.
बदलण्याची तयारी ठेवा : करिअरचा मार्ग नेहमी सरळ नसतो. जर एखाद्याला असे वाटले की त्याने निवडलेले करिअर त्याच्या अपेक्षेप्रमाणे नाही, तर निराश होऊ नये. योग्य मार्गदर्शनाने करिअर बदलण्याचा विचार करता येऊ शकतो. करिअरमध्ये सुधारणा आणि नवीन संधींसाठी नेहमी तयार राहणे महत्त्वाचे आहे.
advertisement
हे ही वाचा : 1.10 कोटी पॅकेजचा जाॅब हवाय? तर 'या' काॅलेजमधून पूर्ण करा शिक्षण, हातात येईल पैसाच पैसा
हे ही वाचा : बारावी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनो लाखोंमध्ये कमाई करायचीय? तर 'हे' आहेत करिअरचे 10 बेस्ट पर्याय, वाचा सविस्तर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहावी-बारावी झालीय, पण करिअर कोणतं निवडायचं? गोंधळात पडू नका, फाॅलो करा 'या' 5 टिप्स, अचूक निर्णय घ्याल!