इंटरनेट मागून अभ्यास केला, पण मजूराच्या मुलानं करुनच दाखवलं, एकाच वेळी मिळाली 4 बँकेत नोकरी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वडील सुरेश चौहान यंत्रमाग चालवतात. तर आई शेतात मजूर म्हणून काम करते आणि मोठा भाऊ धनराज चौहान हासुद्धा मजूरी करतो.
मोहन ढाकले, प्रतिनिधी
बुरहानपुर : अनेकदा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने काही जण हिम्मत हारतात. त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहते. पोरांना सरकारी नोकरी मिळत नाही. म्हणून काही जण मजुरी करायला सुरुवात करतात. मात्र, एक विद्यार्थी असा आहे, ज्याने परिस्थितीशी हार न मानता संघर्ष करत राहिला आणि आज त्याने एकाच वेळी चार बँकांमध्ये नोकरी मिळवली आहे.
advertisement
मनीष चौहान असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 23 वर्षे आहे. तो मध्यप्रदेशच्या बुरहानपु येथील रहिवासी आहे. यंत्रमाग मजुराच्या या मुलाने शेजाऱ्यांकडून नेट मागून यूट्यूबच्या माध्यमातून बँकेच्या परीक्षेची तयारी केली आणि हे यश मिळवले. दोनदा अपयशी झाल्यावरही त्याने हार मानली नाही. आता तिसऱ्या प्रयत्नात या तरुणाची एकाच वेळी चार बँकांमध्ये निवड झाली. आता तो असिस्टंट बँक मॅनेजर झाला आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना मनीष चौहान या तरुणाने सांगितले की, त्यांनी सेवासदन महाविद्यालयातून बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीएडचे शिक्षण घेतलले आहे. त्यानंतर बँकेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वडील सुरेश चौहान यंत्रमाग चालवतात. तर आई शेतात मजूर म्हणून काम करते आणि मोठा भाऊ धनराज चौहान हासुद्धा मजूरी करतो. त्यामुळे मी इतरांकडून इंटरनेट मागून YouTube च्या माध्यमातून बँकेच्या नोकरीची तयारी केली. मी दोनदा नापास झालो. पण मी हारत न मानता तयारी करत राहिलो.
advertisement
flight tickets : स्वस्त मिळेल विमानाचं तिकिट, या दिवशी बुक कराल तर नक्की होईल फायदा
आई-वडिलांची मेहनत पाहून अनेकदा अस्वस्थ व्हायचो. निराश व्हायचो. मात्र, मी मेहनत सोडली नाही. मी तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी देवाच्या माझ्या मेहनतीचे फळ दिले. यावेळी मला मोठे यश मिळाले आणि एकाच वेळी माझी 4 बँकांमध्ये निवड झाली आहे. यानंतर मी आता मध्य प्रदेश ग्रामीण बँकेत असिस्टंट बँक मॅनेजर म्हणून रुजू होण्याचे ठरवले आहे.
advertisement
माझ्या वडिलांची इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी. यासाठी त्यांनी मला शिकवले. मी दिवसरात्र अभ्यास केला. यानंतर आज माझी याठिकाणी निवड झाली. मुलाने संपूर्ण समाजात माझे नाव मोठे केले, अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली.
आयबीपीएस परीक्षा दिल्यावर त्याची मध्यप्रदेश ग्रामीण बँकेत असिस्टेंट मॅनेजर, ग्रामीण बँकेत क्लर्क, जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेत सोसायटी मॅनेजर, आयडीबीआय बँकेत सेल्स एग्झिक्यूटिव्ह या पदांवर त्याची निवड झाली आहे. दरम्यान त्याच्या या निवडीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अनेक जण त्याच्या घरी येऊन त्याचे अभिनंदन करत आहेत. या तरुणाचा हा प्रवास निश्चितच तरुणाईसाठी प्रेरणादाई आहे.
view commentsLocation :
Burhanpur,Madhya Pradesh
First Published :
March 12, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
इंटरनेट मागून अभ्यास केला, पण मजूराच्या मुलानं करुनच दाखवलं, एकाच वेळी मिळाली 4 बँकेत नोकरी


