नोकरी गेली असेल तर चिंता नको, सुरू करा स्वतःचा व्यवसाय, 10 लाखांच्या कर्जावर सरकार देतंय तब्बल 35 टक्के अनुदान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तरुणांना आणि शेतकऱ्यांना सूक्ष्म उद्योग सुरू करून बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी विभागाच्या वतीने कार्य केले जात असल्याचे ते म्हणाले.
आदित्य कृष्ण, प्रतिनिधी
अमेठी : जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुम्हाला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या वतीने मदत मिळणार आहे. यासोबत तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊनही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. अनेक सूक्ष्म उद्योग सुरू करून तुम्ही लाखो रुपयांचा नफा कमवू शकता. त्यासाठी अशा इच्छुक उमेदवारांकडून वेळोवेळी अर्ज मागविण्यात येत आहेत.
advertisement
अमेठीच्या विकास भवनातील उद्यान विभागाच्या ऑफिसमध्ये PMF म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग मार्फत अर्ज करू शकता. यासाठी सुमारे 42 प्रकारचे उद्योग उभारण्यासाठी विभागाकडून 35 ते 50% अनुदान आणि 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेच्या अंतर्गत बेकरी उद्योग, पशू आणि पोल्ट्री फीड उद्योगासह डाळ मिल, राईस मिल, पिठाची गिरणी, तेल गिरणी, दूध उत्पादन, हर्बल उत्पादने, मशरूम उत्पादने, सोयाबीन आधारित उत्पादने, मसाले उद्योग, उसावर आधारित उत्पादने, भाजीपाला उत्पादन, फळ उत्पादन, खारट उद्योग. लहान सूक्ष्म उद्योगही करता येतील. ते उद्योग सुरू करण्यासाठी उद्यान विभागाकडून 10 लाख रुपयांचे कर्ज 35 टक्के सवलतीत दिले जात आहे.
advertisement
अशाप्रकारे करा अर्ज -
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. सोबतच त्याची शैक्षणिक योग्यता कमीत कमी आठवी पास असावी. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकसोबत 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट विभागात जमा करावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अनुदान दिले जाईल. त्यामुळे बेरोजगारीची समस्या दूर होऊन सूक्ष्म उद्योग सहज सुरू करता येतील.
advertisement
100 टक्के मिळणार लाभ -
view commentsजिल्हा उद्यान निरीक्षक प्रमोद कुमार यादव यांनी याबाबत सांगितले की, शासनस्तरावरून जिल्ह्यात अर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यामध्ये अशा अनेक अर्जदारांनी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी विभागाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत असून लोकांना योजनेसाठी अर्ज करण्यास प्रवृत्त करत आहे. तरुणांना आणि शेतकऱ्यांना सूक्ष्म उद्योग सुरू करून बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी विभागाच्या वतीने कार्य केले जात असल्याचे ते म्हणाले.
Location :
Amethi,Lucknow,Uttar Pradesh
First Published :
March 29, 2024 12:59 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
नोकरी गेली असेल तर चिंता नको, सुरू करा स्वतःचा व्यवसाय, 10 लाखांच्या कर्जावर सरकार देतंय तब्बल 35 टक्के अनुदान


