परदेशात नोकरीचं स्वप्न होणार साकार, इस्राईलमध्ये मेगा भरती, लगेच करा अर्ज
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Job Opportunity: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचं अनेकांचं स्वप्न आता साकार होणार आहे.
सोलापूर – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून अनेकांचं परदेशात नोकरीचं स्वप्न देखील आता सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येतेय. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असं आवाहान कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलंय.
‘मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. याअंतर्गत इस्त्राईल देशामध्ये ‘नॉन वॉर झोन’मध्ये घरगुती सहाय्यक (होमबेस्ड हेल्थ केअर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदावारांना लवकर अर्ज करावा लागेल.
advertisement
पात्रता काय?
सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार संधीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांचे वय 25 ते 45 वयोगटात असावे. इंग्रजी भाषेचे सामान्यज्ञान असणारे उमेदवार पात्र असून यासोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगूती सहायक) सेवांसाठी निपून/ पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
advertisement
भारतीय प्राधिकरणाव्दारे मान्यता प्राप्त केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिंस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याबाबततीची तपशीलवार माहिती https://maharashtrainternationl.com या वेबपोर्टलवरील लेटस्ट जॉब या मधळ्याखाली उपलब्ध आहे.
advertisement
कसा करायचा अर्ज?
नोकरीसाठी इच्छुकांनी https://maharashtrainternationl.com या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज अशा संबधित संस्थांनी पुढाकार घेऊन इस्त्राईल येथील वैद्यकिय क्षेत्रातील रोजगार संधीबाबत माहिती अधिकाअधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. तसेच संबंधित रोजगार संधीच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही खंदारे यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 15, 2025 8:10 PM IST








