महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत होतेय मेगा भरती, लगेच करा अर्ज

Last Updated:

विशेष भरती प्रक्रियेसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी लगेच अर्ज करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत होतेय मेगा भरती, लगेच करा अर्ज
महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत होतेय मेगा भरती, लगेच करा अर्ज
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे सरकारी नोकरीची एखादी संधी मिळालीच तर ती कुणीही सोडत नाही. अशीच एक सुवर्णसंधी तरुण वर्गासाठी उपलब्ध झाली आहे. पण या विशेष भरती प्रक्रियेसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी लगेच अर्ज करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ही विशेष भरती प्रक्रियेची संधी उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 24 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विभागासाठी ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळेच ही एक प्रकारची सुवर्णसंधीच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळत आहे. मात्र या भरती प्रक्रियेच्या अंतिम मुदतीसाठी अगदी काही तासच शिल्लक राहिल्याने घाई करावी लागेल.
advertisement
कोणत्या पदांसाठी किती जागा ?
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या या 2024 च्या कोल्हापूर जिल्हा परीषद भरती प्रक्रियेत किटकशास्त्रज्ञ - 06 जागा, सार्वजनिक आरोग्य तज्ञ - 06 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 12 जागा अशा एकूण 24 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरती प्रक्रियेत अर्ज करु इच्छिणाऱ्या तरुणांना या पदांपैकी किटकशास्त्रज्ञ पदासाठी एम.एससी झुलॉजी उत्तीर्ण होऊन 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञ पदासाठी इच्छुक हा एमपीएच/एमएचए/एमबीए इन हेल्थ अशा कोणत्याही वैद्यकिय क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी इच्छुक उमेदवाराने बारावी उत्तीर्ण होऊन डीएमएलटी हा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
advertisement
कधी आहे शेवटची तारीख ?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित पत्त्यावर हे अर्ज 10 जानेवारी 2024 च्या अगोदरच पोहचले पाहिजेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत नोकरी करण्याची ही मोठी संधी वाया न जाऊ देण्यासाठी अर्जदारांनी फटाफट अर्ज करण्याची गरज आहे.
advertisement
कसा आणि कुठे करावा अर्ज?
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या या विशेष भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, (२ रा मजला) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर–416003 या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवावे लागणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तेही जिल्हा परिषदेत सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी तरुणांना मिळत असून याचे कार्यक्षेत्र हे कोल्हापूरच असणार आहे. मात्र अर्ज मुदतीची शेवटची तारीख जवळ आली असल्याने इच्छुकांनी घाई करण्याची गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत होतेय मेगा भरती, लगेच करा अर्ज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement