कोल्हापुरात नोकरीची सुवर्णसंधी! इथं होणार 102 जागांसाठी भरती, प्रक्रिया काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
नोकरीच्या शोधात असणारांसाठी सुवर्णसंधी आहे. कोल्हापुरात 102 जागांसाठी मेगाभरती निघाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
कोल्हापूर : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर (GMC ) अंतर्गत एकूण 102 जागांची भरती करण्यात येत आहे. यासाठी विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलीय. या भरतीमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
महाविद्यालय तसेच रुग्णालयात प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्यरूग्ण सेवक, कक्ष सेवक अशा विविध 102 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. याबाबत https://rcsmgmc.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती पाहता येईल.
advertisement
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
पात्र उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. खुल्या प्रगर्वातील उमेदवारांना वयाची अट ही किमान 18 वर्षे पूर्ण ते 38 वर्ष अशी आहे. तर खुला प्रवर्ग वगळता इतर उमेदवारांना वयाची अट ही 18 वर्षे ते 43 वर्षे अशी आहे. तसेच खुल्या वर्गासाठी 1 हजार रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार असून. राखीव वर्गासाठी ते 900 रुपये असणार असल्याची माहिती देण्यात आलीये.
advertisement
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
भरती प्रक्रियेला अर्ज करताना अर्जातील नावाचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, वयाचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, भुकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुराव आश्यक आहे.
advertisement
अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्यास पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 18, 2024 1:01 PM IST


