गरिबीतून बाहेर पडायचंय? व्हाल कोट्याधीश, हातात येतील दीड कोटी! हा आहे सोपा फॉर्म्युला
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
SIP: तज्ज्ञ सांगतात, एसआयपी (SIP) हा गुंतवणुकीचा राजमार्ग आहे. यात गुंतवणुकीच्या इतर प्रकारांपेक्षा जोखीम कमी असते. म्हणूनच याकडे सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. याबाबत गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : झटपट पैसा मिळाला तर कोणाला नाही आवडणार पण पैसे पाहिजे तर मेहनत हवीच. शिवाय पैसे नेमके कुठे गुंतवायचे याची व्यवस्थित माहितीही असायला हवी. इंटरनेटचा विस्तार आणि गुंतवणुकीबाबत झालेली जागरुकता यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कशातून जास्तीत जास्त नफा मिळेल असा गुंतवणुकीचा पर्याय गुंतवणुकदार शोधत असतात. अशात शेअर्स, आयपीओ, म्युच्युअल फंड्सना प्रचंड पसंती मिळते. तज्ज्ञ सांगतात, एसआयपी (SIP) हा गुंतवणुकीचा राजमार्ग आहे. यात गुंतवणुकीच्या इतर प्रकारांपेक्षा जोखीम कमी असते. म्हणूनच याकडे सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. याबाबत गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
SIP म्हणजे काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याद्वारे म्युच्युअल फंड कंपनी दर महिन्याला आपल्या खात्यातून एक आपण ठरवलेली रक्कम कट करते. मग हे पैसे स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवून आपल्याला त्याचा परतावा देते.
एकदा तुम्ही म्युच्युअल फंडासोबत एसआयपीसाठी नोंदणी केली की, तुमची मासिक गुंतवणूक ही तुमच्या ध्येयांवर आधारित असते. किमान सहाव्या किंवा सातव्या वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की, परताव्यावर मिळणारं उत्पन्न हे तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेपेक्षा जास्त आहे.
advertisement
SIP रुपये किंमतीच्या सरासरीकरणाच्या (Rupee Cost Averaging) तत्त्वावर कार्य करते. म्हणजेच जेव्हा बाजार घरसतं तेव्हा जास्त खरेदी केली जाते आणि जेव्हा बाजार वर असतं तेव्हा कमी युनिट्स खरेदी केले जातात. परंतु प्रत्येकवेळी समान रक्कम गुंतवली जाते. अशाप्रकारे खरेदीच्या खर्चाची सरासरी करून वेळेचा विचार न करता बाजाराच्या चढ-उतारांमुळे फायदा मिळवता येतो. दरम्यान, SIP पद्धतीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही बाजारातील अस्थिरता आणि जोखमीच्या अधीन असते.
advertisement
SIP गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की, तुम्ही लहान रक्कमेनं सुरुवात करून मोठा परतावा मिळवू शकता. उदाहरणार्थ रु. 15% रिटर्नवर 25 वर्षांसाठी दरमहा 5,000 अशी सुरुवात होऊ शकते. त्यातून रु. 1.65 कोटी मिळू शकतात. यात तुमचं योगदान असेल फक्त रु. 15 लाख.
एकदा ठराविक रक्कमेनं SIP सुरू केल्यास त्यात तुम्ही अडकत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी वाढ किंवा कमी करू शकता. तसंच SIP कधीही थांबवल्या जाऊ शकतात. बचत आणि शिस्तीची अशी ही लवचिक फायदेशीर गुंतवणूक आहे. जास्त काळ SIPमध्ये राहिल्यानं, रुपयाची किंमत सरासरी आणि चक्रवाढ तुमच्या बाजूनं काम करते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 17, 2024 4:42 PM IST
मराठी बातम्या/मनी/
गरिबीतून बाहेर पडायचंय? व्हाल कोट्याधीश, हातात येतील दीड कोटी! हा आहे सोपा फॉर्म्युला