SIP Rule: करोडपती व्हायचा मार्ग सापडला, 7-5-3-1 काय आहे SIP चा नियम?

Last Updated:

ॲसेट क्लासेसमध्ये हाय क्लॉलिटीचे किंवा लार्ज-कॅप स्टॉक्स, व्हॅल्यु स्टॉक्स, ग्रेप (वाजवी मूल्यावर वाढ) स्टॉक्स, मिडकॅप किंवा स्मॉल-कॅप स्टॉक्स आणि ग्लोबल स्टॉक्स यांचा समावेश होतो.

News18
News18
पैशांशिवाय आयुष्यात काही गोष्टी साध्य करणं शक्य नाही, हे लक्ष आल्यामुळे आता आर्थिक गुंतवणुकीकडे विशेष लक्ष दिलं जातं. बचतीसाठी लोक स्मॉल सेव्हिंग स्कीम्स, बचत खाती, मुदत ठेवी, कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर अनेक ठिकाणी पैसे जमा करतात. अनेक वर्षे गुंतवणूक करूनही त्यांना कोट्यधीश होता येत नाही. कारण, बहुतांशी लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे (एसआयपी) नियम पाळत नाहीत. एसआयपीच्या नियमांचे पालन करून तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यास भरघोस रिटर्न मिळवता येतो. एसआयपीच्या या नियमांमध्ये 7-5-3-1 या नियमाचा समावेश होतो. 'प्रभात खबर'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एसआयपी म्हणजे काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला थोडक्यात एसआयपी म्हणतात. म्युच्युअल फंड कंपन्यांनी ऑफर केलेला एसआयपी हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार नियमितपणे म्युच्युअल फंड योजनेत निश्चित रक्कम गुंतवू शकतात. यामुळे रुपयाच्या सरासरी मूल्याचा फायदा मिळतो आणि मार्केटमधील चढउतारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
7-5-3-1 या एसआयपी नियमातील सात म्हणजे काय?
advertisement
एसआयपीचा 7-5-3-1 नियम गुंतवणुकदारांना किमान सात वर्षांसाठी इक्विटी फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. किमान सात वर्षे इक्विटी एसआयपीमध्ये गुंतवणूक करून चक्रवाढ व्याज पूर्ण क्षमतेपर्यंत जाते. ही रणनीती मार्केटमधील चढउतार स्थिर करण्यासाठी आणि गुंतवलेले भांडवल वाढवण्यासाठी पुरेसा वेळ देते.
7-5-3-1 या एसआयपी नियमातील पाच म्हणजे काय?
स्थिरता आणि वाढीसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे हे एसआयपीच्या 7-5-3-1 नियमातील दुसरं तत्व आहे. जोखीम आणि परतावा प्रभावीपणे संतुलित करण्यासाठी फाइव्ह फिंगर फ्रेमवर्क आपल्याला पाच प्रमुख ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देते. ॲसेट क्लासेसमध्ये हाय क्लॉलिटीचे किंवा लार्ज-कॅप स्टॉक्स, व्हॅल्यु स्टॉक्स, ग्रेप (वाजवी मूल्यावर वाढ) स्टॉक्स, मिडकॅप किंवा स्मॉल-कॅप स्टॉक्स आणि ग्लोबल स्टॉक्स यांचा समावेश होतो.
advertisement
लार्ज-कॅप स्टॉक्स: हाय-क्लॉलिटीचे किंवा लार्ज-कॅप स्टॉक्स हे मजबूत गुंतवणूक पोर्टफोलिओचा पाया आहेत. कारण, त्यांच्याकडे मजबूत आर्थिक मूलभूत आणि कामगिरीचे रेकॉर्ड्स आहेत. ते मार्केटमधील मंदीच्या काळात स्थिरता प्रदान करतात आणि पोर्टफोलिओची अस्थिरता कमी करण्यास मदत करतात.
व्हॅल्यु स्टॉक्स: सध्या मार्केटमध्ये या स्टॉक्सचं मूल्यांकन कमी आहे. त्यामध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कारण, त्यांचं मूल्य वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
ग्रेप स्टॉक्स: उदयोन्मुख किंवा वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रातील आशादायक कंपन्या म्हणजे ग्रेप स्टॉक्स आहेत. वाढ आणि गुंतवणूक मूल्य दोन्ही एकत्र करण्याचं काम हे स्टॉक्स करतात. भारतातील ड्रोन आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे स्टॉक्स मिळू शकतात. यामध्ये भविष्यात लक्षणीय वाढीची क्षमता असते.
मिडकॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्स: मिडकॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्स मोठ्या प्रमाणात वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांचं प्रतिनिधित्व करतात. तर लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये अधिक रिस्क असते. असे स्टॉक्स बंपर रिटर्न देऊ शकतात.
advertisement
ग्लोबल स्टॉक्स: या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्याने पोर्टफोलिओमध्ये भौगोलिक विविधता वाढते. हे स्टॉक्स स्थानिक आर्थिक मंदीपासून संरक्षण करतात. यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये संधी देखील मिळते, देशांतर्गत जोखमींपासून बचाव होतो आणि पोर्टफोलिओ रिटर्न वाढतो.
7-5-3-1 या एसआयपी नियमातील तीन म्हणजे काय?
तीन प्रकारच्या आव्हानात्मक टप्प्यांसाठी तयार राहणे हे एसआयपीतील 7-5-3-1 नियमातील तिसरं तत्त्व आहे. एसआयपी गुंतवणूकदारांना अनेकदा आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. नैराश्य, चिडचिड आणि भीती यांचा आव्हानात्मक गोष्टींमध्ये समावेश होतो.
advertisement
नैराश्य (7-10 टक्के रिटर्न): एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यानंतर गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळण्याची अपेक्षा असते. अशा स्थितीत पैसे गुंतवल्यानंतर सरासरी परतावा मिळाला तर ते निराश होतात. हे समजून घेणे फार महत्वाचं आहे की, सरासरी किंवा मध्यम परतावा मिळत असला तरीही सकारात्मक मानसिकता ठेवून गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे. असं केल्यास तुम्ही सकारात्मक मानसिकतेने प्रगती साधता आणि गुंतवणूक प्रक्रियेचा भाग बनता.
advertisement
चिडचिड (0-7टक्के रिटर्न): एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 0-7 टक्के परतावा मिळाल्यास गुंतवणूकदारांना अस्वस्थ वाटू शकतं. फिक्स्ड डिपॉझिट यापेक्षा चांगला परतावा देऊ शकले असते, या विचाराने ते त्रस्त होतात. गुंतवणूकदारांनी हे मान्य केलं पाहिजे की, मार्केटमधील चढउतार सामान्य आहेत. एसआयपी दीर्घकालीन वाढीसाठीचा पर्याय आहे. त्यातून अल्पकालीन रिटर्नची अपेक्षा ठेवू नये.
भीती (नकारात्मक रिटर्न): एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, पोर्टफोलिओचं मूल्य सुरुवातीच्या गुंतवणुकीपेक्षा खाली आलं तर कमी परतावा मिळण्याची भीती वाटू लागते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी शांत राहिलं पाहिजे.
7-5-3-1 या एसआयपी नियमातील एक म्हणजे काय?
पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवलेली रक्कम दरवर्षी वाढवणे, हे 7-5-3-1 एसआयपी नियमातील शेवटचं तत्व आहे. तुमची वार्षिक एसआयपी रक्कम सतत वाढवल्याने तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओतील अंतिम मूल्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. परिणामी तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो.
मराठी बातम्या/मनी/
SIP Rule: करोडपती व्हायचा मार्ग सापडला, 7-5-3-1 काय आहे SIP चा नियम?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement