NEET GP Exam Date : नीट पीजी परीक्षेच्या तारखेची घोषणा, दोन शिफ्टमध्ये होणार पेपर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
NEET GP Exam Date : नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केलीय. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
मुंबई : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केलीय. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. याआधी २३ जून रोजी परीक्षा होणार होती. मात्र ती स्थगित करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने नीट यूजी आणि युजीसी नेट पेपर लीक प्रकरणातील गोंधळामुळे एक दिवस आधीच ही परीक्षा पुढे ढकलणार असल्याची माहिती दिली होती. नीट पीजी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या शिफ्टसंदर्भात बोर्डाच्या संकेतस्थळावर माहिती दिली जाणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसीन आणि पीजी डिप्लोमा प्रोग्रॅमसाठी ही परीक्षा दिली जाते. ज्यांच्याकडे एमबीबीएसची डीग्री किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं मान्यताप्राप्त प्रोविजनल एमबीबीएस सर्टीफिकेट आहे त्यांना ही परीक्षा देता येते.
दरम्यान, देशात नीटच्या पेपर लीक प्रकरणाने एकच गोंधळ उडाला होता. त्यातच काही दिवसापूर्वी यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यावरून केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयावर जोरदार टीका करण्यात आली होती. देशामध्ये परीक्षा रद्द प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरू झाले होते. विरोधकांनी नीट व यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. विद्यार्थ्यांमध्येही परीक्षा रद्द झाल्यामुळे असंतोष होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2024 3:18 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
NEET GP Exam Date : नीट पीजी परीक्षेच्या तारखेची घोषणा, दोन शिफ्टमध्ये होणार पेपर


