Railway job : रेल्वेमध्ये निघाली बंपर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता फक्त 12 वी

Last Updated:

12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये बंपर भरती होणार आहे.

News18
News18
मुंबई, प्रतिनिधी : 12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये बंपर भरती होत आहे, तुम्हालाही रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता. साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून हे भरती अभियान राबवलं जात आहे. साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसच्या 1000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, इच्छुक उमेदवार 1 मे 2024 पर्यंत अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in द्वारे रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करू शकतात. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षादरम्यान आहे तेच रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करू शकतात.  या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती, रिक्त जागा किती आहेत, पात्रतेच्या अटी काय आहेत आणि अप्रेंटिस ट्रेनिंग किती कालावधीसाठी असेल ते जाणून घेऊयात.
किती रिक्त जागा ?
रेल्वे भरती 2024 अभियानाच्या माध्यमातून अप्रेंटिस पदासाठी एकूण 1113 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. यात वेल्डरची 161 पदं, टर्नरची 54 पदं, फिटरची 202 पदं, इलेक्ट्रिशियनची 212 पदं, स्टेनोग्राफरची 23 पदं, कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमर असिस्टंटची 10 पदं, हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरची 25 पदं, मशिनिस्टची 15 पदं, मेकॅनिक डिजीटलच्या 81 जागा, मेकॅनिकल रेफ्रिजरेटरच्या 21 जागा, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या 35 पदांचा समावेश आहे.
advertisement
अर्ज फी
रेल्वे अप्रेंटिस भर्ती 2024 च्या कोणत्याही कॅटेगरीतील उमेदवारांना कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.
पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून बारावीची परीक्षा 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील (ITI) संबंधित ट्रेडचे ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
अप्रेंटिस ट्रेनिंग
निवडलेल्या उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून नियुक्त केलं जाईल. याचबरोबर त्यांना प्रत्येक ट्रेडसाठी एक वर्षासाठी अप्रेंटिस ट्रेनिंग दिली जाईल. या कालावधीत या उमेदवारांना स्टायपेंडही दिले जाईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Railway job : रेल्वेमध्ये निघाली बंपर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता फक्त 12 वी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement