Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, ऊसतोड कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात सैन्यात दाखल, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे यांची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. शंकरचं कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे.
पुणे : ऊसतोड कामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे याचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे. बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शंकरचं कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
शंकर इथापे याने सांगितलं की, गेल्या तीन पिढ्यांपासून माझं कुटुंब ऊसतोडणीचं काम करत आहे. या कामात प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना मी खूप शिकावं असं वाटत होतं. त्यामुळे 10 वी झाल्यानंतर 2023 मध्ये बारामती गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी माझ्या आई-वडिलांनी उचल घेऊन मला पैसे दिले होते.
advertisement
चुलत भावाकडून मिळाली प्रेरणा
शंकरचा चुलत भाऊ कृषीराज इथापे हा 2022-23 च्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाला होता. कृषीराजच्या प्रेरणेने शंकरने दहावी उत्तीर्ण होताच बारामती येथील एका खासगी पोलीस अकादमीत प्रवेश घेतला. शंकरला पोलीस व्हायचं होतं पण त्याचं वय 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे त्याने थेट अग्निवीर भरती परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला.
advertisement
सलग दोन वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीमुळे शंकरने या यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशामुळे अनेक ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, ऊसतोड कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात सैन्यात दाखल, Video

