ऑफिस 1600 किमी लांब, स्टारबक्सच्या CEOला ये-जा करायला प्रायव्हेट जेट; पगार वाचून बसेल धक्का
- Published by:Suraj Yadav
- trending desk
Last Updated:
सध्या निक्कोल चिपोटल कंपनीचे सीईओ आहेत. नऊ सप्टेंबर रोजी ते स्टारबक्स कंपनीच्या सीईओपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत.
मुंबई : मोठ्या कंपन्यांच्या सीईओंचा पगारही खूप मोठा असतो, हे माहिती असेल. हे आकडे ऐकून धक्काच बसतो. आता स्टारबक्स या जगातल्या नामवंत कॉफी आउटलेट ब्रँडने या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. या कंपनीने आपल्या सीईओंना खूप सुविधा दिल्या आहेत. त्याबद्दल कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल. त्यांविषयी जाणून घेऊ या. स्टारबक्स या कंपनीने ब्रायन निक्कोल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या ऑफर लेटरवरून अशी माहिती मिळाली आहे, की कंपनी त्यांना सिअॅटलमधल्या मुख्य कार्यालयात येण्यासाठी कॅलिफोर्नियातल्या त्यांच्या घरी प्रायव्हेट जेट विमान पाठवणार आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये अशी माहिती देण्यात आली आहे, की कंपनीच्या 2023 या वर्षाच्या हायब्रिड पॉलिसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्यातले तीन दिवस कंपनी सीईओंना ऑफिसमध्ये आणण्यासाठी प्रायव्हेट जेट विमान पाठवणार आहे. कंपनीच्या मुख्यालयापासून ब्रायन निक्कोल यांचं घर तब्बल 1600 किलोमीटर दूर आहे. ब्रायन निक्कोल पुढच्या महिन्यात स्टारबक्स कंपनीत रुजू होऊन आपला पदभार स्वीकारणार असल्याचं वृत्त आहे. यामुळे साहजिकच जगभर निक्कोल यांचं नाव चर्चेत आलं आहे; मात्र निक्कोल यांचं नाव चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही.
advertisement
सध्या निक्कोल चिपोटल कंपनीचे सीईओ आहेत. नऊ सप्टेंबर रोजी ते स्टारबक्स कंपनीच्या सीईओपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. तोपर्यंत स्टारबक्सचे सध्याचे सीएफओ राचेल रग्गेरी हेच अंतरिम सीईओ म्हणून कामकाज पाहत आहेत.
50 वर्षीय निक्कोल यांना वार्षिक सुमारे 14 कोटी रुपये वेतन दिलं जाणार आहे. तसंच, दर वर्षी त्यांना 60 कोटी रुपये रोख बोनसही मिळेल. अर्थातच हा बोनस त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. मीडिया रिपोर्ट्स असं सांगतात, की या व्यतिरिक्त कंपनीचे एक अब्ज 92 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक शेअर्स प्राप्त करू शकतात. 2018 साली निक्कोल चिपोटलचे सीईओ होणार होते, तेव्हा कंपनीचं मुख्यालय कोलोरॅडोमध्ये होतं. निक्कोल यांच्या मागणीनंतर ते जॉइन झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत कंपनीने आपलं मुख्यालय कॅलिफोर्नियाला त्यांच्या घराजवळ स्थलांतरित केलं.
advertisement
याआधी लक्ष्मण नरसिंहन हे स्टारबक्सचे सीईओ होते. त्यांच्या कार्यकाळात चीन आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत कंपनीच्या व्यवसायात मोठी घसरण आली. त्यानंतर त्यांच्या जागी निक्कोल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2024 12:42 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
ऑफिस 1600 किमी लांब, स्टारबक्सच्या CEOला ये-जा करायला प्रायव्हेट जेट; पगार वाचून बसेल धक्का


