एरोनॉटिकल इंजिनीअरला किती मिळतो पगार, कुठे घ्यावं लागतं शिक्षण?

Last Updated:

हे इंजिनीअर्स फक्त विमानांची निर्मिती करत नाहीत. या क्षेत्राचा विस्तार आपल्या कल्पनेपेक्षा फार जास्त आहे. हे इंजिनीअर्स सर्व प्रकारचं उड्डाण तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करतात.

News18
News18
मुंबई : कमी कालावधीत जास्त अंतर पार करणं, हे विमान प्रवासाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेक प्रवासी घाईघडबडीच्या कारणांसाठी आणि परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाचा पर्याय स्वीकारतात. पण, आकाशातून ही विमाने कशी उडत राहतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर हा एरोनॉटिकल इंजिनीअर्सचे कष्ट आणि हुशारीचा अप्रतिम नमुना आहे. विमान बनवण्याचे आणि उडवण्याचे संपूर्ण तंत्रज्ञान एरोनॉटिकल इंजिनीअरिंग या विद्याशाखेत शिकवलं जातं. हे इंजिनीअर्स अनेक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करतात. एरोनॉटिकल इंजिनीअर्स विमान उड्डाणामागील विज्ञान, त्यातील इलेक्ट्रॉनिक प्रणाली, मजबूत घटकाचा वापर, त्याचं इंजिन तंत्रज्ञान या सर्व घटकांवर काम करतात. ते असं तंत्रज्ञान तयार करतात ज्यामुळे हवाई प्रवास अधिक चांगला, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होतो.
हे इंजिनीअर्स फक्त विमानांची निर्मिती करत नाहीत. या क्षेत्राचा विस्तार आपल्या कल्पनेपेक्षा फार जास्त आहे. हे इंजिनीअर्स सर्व प्रकारचं उड्डाण तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करतात. लष्करी विमानं, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्पेसक्राफ्ट निर्मितीमध्येही त्यांचा सहभाग असतो. नवीन डिझाईनच्या विमानांची चाचणी घेणं किंवा जुनी विमानं सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधण्याचं काम हे इंजिनीअर्स करतात. या सर्व गोष्टी सुरक्षितता आणि प्रदूषणाच्या नियमांनुसार केल्या गेल्या आहेत याचीही ते पडताळणी करतात.
advertisement
एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा इतिहास
एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा इतिहास खूप जुना आहे. पण, त्याला खरी ओळख 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस मिळाली. त्या काळात विमानं बनवणारे प्रमुख शास्त्रज्ञ पुढे आले. हे शास्त्रज्ञ सर जॉर्ज केली यांच्या संशोधनाच्या आधारे काम करत होते. सर जॉर्ज हे हवेत उडण्यासाठी गरजेच्या असलेल्या लिफ्ट (उर्ध्वगामी हालचालीची शक्ती) आणि ड्रॅग (पुढे जाण्यासाठी हवेचा अडथळा) या दोन गोष्टींमध्ये अंतर असल्याचे दाखवणारी पहिली व्यक्ती होते.
advertisement
राईट ब्रदर्सने डिसेंबर 1903 मध्ये, इंजिनवर चालणारं पहिलं आणि हवेपेक्षा जड विमान उडवण्यात यश मिळवलं. त्यांचं पहिलं उड्डाण फक्त 12 सेकंदांचं होतं. 1914 मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे विमानांमध्ये सुधारणा करण्याची स्पर्धा लागली. अशा प्रकारे एरोनॉटिकल इंजिनीअर्सची मागणी वाढली. ही मागणी 1918 ते 1939 या काळात सातत्याने सुरू राहिली.
advertisement
1939 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं. त्यानंतर विमान तंत्रज्ञान अधिक वेगानं विकसित झालं. 1944 मध्ये जेट इंजिनवर चालणारं पहिलं विमान बनवण्यात आले. यानंतर, फेब्रुवारी 1958 मध्ये, या सर्व तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी 'एरोस्पेस इंजिनीअरिंग' हा शब्द वापरला जाऊ लागला. ऑक्टोबर 1957 मध्ये (स्पुटनिक) आणि जानेवारी 1958मध्ये (एक्सप्लोरर I) पहिले अंतराळ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
advertisement
पुढील दशकांत नवनवीन शोध लागत राहिले. जानेवारी 1970 मध्ये, पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाने न्यूयॉर्क ते लंडन उड्डाण केलं. हे विमान बोईंग 747 कॅटेगरीमधील होतं. 1976 मध्ये, कॉनकॉर्डची बांधणी झाली. हे आवाजापेक्षा वेगानं उडणारं पहिलं प्रवासी विमान होतं. 2007 मध्ये, एअरबस A380 विमानाने पहिलं उड्डाण केलं. हे विमान एकाच वेळी 853 वाहून नेऊ शकतं.
advertisement
एरोनॉटिकल इंजिनीअर होण्यासाठी काय करावं?
एरोनॉटिकल इंजिनीअर होण्याची इच्छा असेल तर शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना गणित आणि विज्ञान विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला एरोस्पेस इंजिनीअरची पदवी (बीटेक/बीई एरोनॉटिकल इंजिनीअर) घ्यावी लागेल. काही युनिव्हर्सिटींमध्ये एरोनॉटिकल आणि ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनीअरिंगसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. काही अभ्यासक्रम असे आहेत ज्यात पहिली दोन वर्षे जनरल इंजिनीअरिंगचा अभ्यास करता येतो आणि त्यानंतरची दोन वर्षे विमान आणि अवकाश तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येतो.
advertisement
फक्त पदवी मिळवून ज्युनिअर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळू शकते. पण, तुम्हाला मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी फायदेशीर ठरू शकते. डिप्लोमा, बॅचलर डिग्री, मास्टर्स डिग्री किंवा पीएचडीसारख्या विविध स्तरांवर एरोनॉटिकल आणि स्पेस तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येतो.
या सर्व अभ्यासक्रमांदरम्यान प्रॅक्टिकली खूप काही शिकण्याची संधी मिळू शकते. ड्रोन उडवणे, फ्लाइट सिम्युलेटरमध्ये विमान उडवणे किंवा प्रत्यक्ष विमानाचं चाचणी उड्डाण करणे, या गोष्टी शिकता येतात. जर तुम्हाला युनायटेड किंग्डमसारख्या इतर कोणत्याही देशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुमचं इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असलं पाहिजे. जर अमेरिकेसारख्या देशात कोर्स करण्याची इच्छा असेल तर तिथे इंजिनीअर होण्यासाठी काही विशेष परवानग्या (लायसन्स) घ्याव्या लागतील.
आजकाल विमान उत्पादक कंपन्यांमध्ये प्रगत सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ही सॉफ्टवेअर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी आणि ती माहिती समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे एरोनॉटिकल इंजिनीअर होण्यासाठी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकणे देखील गरजेचं झालं आहे.
कोणते विषय शिकवले जातात?
एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना, अंतराळयान आणि विमाने बनवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री आणि ते बनवण्याचे तंत्रज्ञान (एरोस्पेस मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी), विमानाची रचना (एअरक्राफ्ट स्ट्रक्चर), थर्मोडायनॅमिक्स, द्रव पदार्थांची हालचाल आणि यंत्रशास्त्र (फ्लुईड डायनॅमिक्स आणि मेकॅनिक्स), फ्लाईट मेकॅनिक्स आणि एअरोडायनॅमिक्स, विमानाची रचना (एअरक्राफ्ट डिझाईन), एव्हियॉनिक्स नेव्हिगेशन यासह इतर काही विषय शिकवले जातात. एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विमान, क्षेपणास्त्रे, अंतराळयान, ड्रोन इत्यादींशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास सक्षम होतात.
भारतातील एरोनॉटिकल इंजिनीअरिंग कॉलेज
भारतातील अनेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इयत्ता 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 टक्के गुण मिळवावे लागतात. इयत्ता 10 वीमध्ये 50 टक्के गुण आणि डिप्लोमा प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी देखील या कोर्ससाठी अर्ज करू शकतात.
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), बॉम्बे
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूर
- हिंदुस्थान इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), खरगपूर
- भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIST), त्रिवेंद्रम
- सत्यभामा युनिव्हर्सिटी
- मणिपाल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, देहराडून
एरोनॉटिकल इंजिनीअर कुठे काम करतात?
एरोनॉटिकल इंजिनिअर्सना कधीकधी ऑफिसमध्ये बसून नवीन विमानांचं डिझाईन आणि सुधारण्याचे नियोजन करावं लागतं. काहीवेळा त्यांना विमाने किंवा त्यांचं तंत्रज्ञान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जावं लागतं.
बहुतांशी इंजिनीअर्स मोठ्या विमान निर्मिती कंपन्यांमध्ये काम करतात. यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या (बीएलएस) 2021मधील अहवालानुसार, 33 टक्के एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनीअर्स विमानाचे भाग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करतात. या शिवाय अभियांत्रिकी सेवा देणाऱ्या कंपन्या, सरकारी कंपन्या, नकाशे आणि नेव्हिगेशन उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या, संशोधन आणि विकास करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील त्यांना काम करण्याची संधी असते.
गेल्या काही वर्षांत एरोस्पेस उद्योगात थोडीशी घसरण झाली आहे. पण, 2030 पर्यंत त्यात लक्षणीय वाढ होईल असा अंदाज आहे. कारण, अशा विमानांची मागणी वाढण्याची शक्यता आहे जी कमी आवाज करतात, कमी फ्युएल वापरतात आणि अधिक सुरक्षित असतात.
एरोनॉटिकल इंजिनीअरचा पगार किती असतो?
एरोनॉटिकल इंजिनीअरचा पगार अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही कुठे राहता, तुम्हाला किती अनुभव आहे, तुमच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता, या सर्वांचा पगारावर परिणाम होतो. काही रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमधील नवोदित एरोनॉटिकल इंजिनीअरला दरवर्षी 27 हजार युरोपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.
मे 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील एरोनॉटिकल आणि ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनीअर्स वार्षिक सरासरी 122,970 डॉलर्स कमवतात. तर भारतात एरोनॉटिकल इंजिनिअरचं वार्षिक पॅकेज सहा ते 10 लाखांच्या दरम्यान सुरू होते. अनुभवासोबत पॅकेज वाढत जाते.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
एरोनॉटिकल इंजिनीअरला किती मिळतो पगार, कुठे घ्यावं लागतं शिक्षण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement