Wada Crime: "दिलेले पैसे परत दे आणि..." लग्नाचा बहाणा, नवरीची लाखोंना विक्री, पालघर जिल्ह्यातली धक्कादायक घटना

Last Updated:

Wada Bride Selling Case: वाडा तालुक्यातील गारगाव येथील एका 20 वर्षीय आदिवासी तरूणीची नाशिक जिल्ह्यांत दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न करून तिची लाखो रूपयांमध्ये विक्री केल्याची घटना घडलीय.

Wada Crime: "दिलेले पैसे परत दे आणि..." लग्नाचा बहाणा, नवरीची लाखोंना विक्री, पालघर जिल्ह्यातली धक्कादायक घटना
Wada Crime: "दिलेले पैसे परत दे आणि..." लग्नाचा बहाणा, नवरीची लाखोंना विक्री, पालघर जिल्ह्यातली धक्कादायक घटना
वाडा तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाडा तालुक्यातील गारगाव येथील एका 20 वर्षीय आदिवासी तरूणीची नाशिक जिल्ह्यांत लाखो रूपयांमध्ये विक्री केल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न करून देत तिची विक्री करण्याची घटना घडलीय. लग्न करून देण्याच्या बहाण्याने त्या 20 वर्षीय तरूणीची लाखो रूपयांनी विक्री केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्या मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस संपूर्ण घटनेची कसून चौकशी करीत आहेत.
वाडा तालुक्यातील गारगाव गावातील 20 वर्षीय तरूणीचा विवाह सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा गावातील 31 वर्षीय व्यक्तीसोबत मे 2024 मध्ये लग्न झालं होतं. 20 वर्षीय तरूणीचं 31 वर्षीय सुनील गायधनीसोबत 9 मे 2024 सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये हळू हळू वादाचे खटके उडू लागले. वादामध्ये तरूणीचा नवरा आणि सासू तिला टोमणे मारणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि शेजारील लोकांसोबत बोलून न देणे असा प्रकार करत होते. त्या तरूणीच्या सासरकडील लोकं इतक्यावरच थांबले नाहीत, तिला मारहाण सुद्धा करायचे.
advertisement
या वादामध्ये, सुनील गायधनीसोबत त्याची आई सुमन गायधनी, रघुनाथ दुधवडेसह आणखी एक आरोपीचा समावेश आहे. असे चौघेजण त्या 20 वर्षीय तरूणीचा छळ करायचे. जेव्हा ती तरूणी लग्नाच्या काही महिन्यांनंतर गर्भवती राहिली, तेव्हा तिचा नवरा तिला पट्ट्याने बऱ्याचदा मारहाण करायचा. शिवाय तिला घालून पाडून सुद्धा बोलायचा. 'तू आमच्या घरी राहू नकोस, तुझ्याशी लग्न करण्यासाठी रघुनाथ दुधवडेसोबत आणखी एका व्यक्तीला आम्ही 3 लाख रुपये दिले होते. ते आम्हाला पैसे परत दे आणि इथून निघून जा,' असं त्या तरूणीला तिच्या सासरकडचे लोकं म्हणायचे. या अवस्थेत घाबरलेल्या महिलेने वाडा पोलिस ठाणे गाठून सासरकडच्या नागरिकांविरोधात गुन्हा नोंदवला होता.
advertisement
दरम्यान, पीडित महिलेने 20 जून 2025 रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर 6 जानेवारी 2026 रोजी तिला नवरा, सासू आणि नणंद तिला वडगावला घेऊन जाण्यासाठी आले. मात्र, सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने सासरी जाण्यास नकार दिला. त्यावेळी तिच्या सासरकडच्यांनी तिला 'तू आली नाहीस तरी चालेल, आम्हाला आमचा मुलगा दे,' असे सांगितले. त्या पीडित महिलेने सासू आणि नवऱ्याच्या धमकीला घाबरून विवाहितेने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी त्या पीडितेला पोलिस ठाण्यात नेऊन पती, सासू आणि इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. मेहेर करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Wada Crime: "दिलेले पैसे परत दे आणि..." लग्नाचा बहाणा, नवरीची लाखोंना विक्री, पालघर जिल्ह्यातली धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement