'ताटात उष्टं अन्न का ठेवले', म्हणत पेटला वाद, लेकाने उचलली कुऱ्हाड अन् संपवलं बापाला, इतकंच नाहीतर...

Last Updated:

13 ऑगस्ट रोजी वडील रामराव यांनी मुलगा शिवाजी याला टोचून बोलले की, "तू काम करत नाही. घराकडे लक्ष देत नाहीस." त्याचवेळी ताटात...

Crime News
Crime News
संग्रामपूर (जि. बुलढाणा) : 'ताटात उष्टं अन्न का ठेवलं', या किरकोळ कारणावरून मुलाने बापाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरला आणि पूर्णा नदीत फेकून दिला. ही धक्कादायक संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे घडली. यासंदर्भात आरोपीच्या पत्नीनेच तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
जेवणाच्या ताटावर झाला बाप-लेकाचा वाद
पोलिसांच्या माहितीनुसार रामराव तेल्हारककर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, तर शिवाजी तेल्हारकर आणि त्याचा मुलगा कृष्णा तेल्हारकर अशी आरोपींची नावं आहेत. 13 ऑगस्ट रोजी वडील रामराव यांनी मुलगा शिवाजी याला टोचून बोलले की, "तू काम करत नाही. घराकडे लक्ष देत नाहीस." त्याचवेळी ताटात उष्टं अन्न ठेवल्यामुळे दोघा बापलेकांच्यात वाद झाला. संतापलेल्या मुलाने अर्थात शिवाजीने कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 19 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली.
advertisement
बायकोने उघड केला नवऱ्याचा कांड
त्यानंतर मुख्य आरोपी शिवाजी आणि त्यांचा मुलगा (मृत व्यक्तीचा नातू) कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला. ते घेऊन दुचाकीवरून खिरोडा पुलावर गेले आणि पूर्णा नदीत मृतदेह फेकून दिला. ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत व्यक्तीची सून योगिता शिवाजी तेल्हारकर हिने पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'ताटात उष्टं अन्न का ठेवले', म्हणत पेटला वाद, लेकाने उचलली कुऱ्हाड अन् संपवलं बापाला, इतकंच नाहीतर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement