दुपारच्या सुट्टीत थांबवायचा अन्...परप्रांतीय चिमुरडीवर नराधम शिक्षकाचे अत्याचार; नगर हादरलं

Last Updated:

नराधम शिक्षक दुपारच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर विद्यार्थिनीला एकटीला शाळेत थांबवून घेत तिच्यावर अत्याचार करत होता.

News18
News18
अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पाच जणांविरोधात पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, 1 जुलै 2025 रोजी शाळेत दुपारच्या सुट्टीत शिक्षकाने अत्याचार केले आहे. दुपारच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर विद्यार्थिनीला एकटीला शाळेत थांबवून घेत आणि अत्याचार करत होता. मुलीला त्रास झाल्यानंतर तिने आरडाओरडा केला तर तिच्या पाठीवर, तोंडावर चापट मारत होता, असा आरोप शिक्षकाने केला आहे.

परप्रांतीय विद्यार्थिनीवर अत्याचार

advertisement
शिक्षक एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित मुलीला पुन्हा शाळेत येण्यासाठी भाग पाडले आणि मानसिक त्रास दिला, असे तक्रारीत नमूद आहे. एक महिन्यापासून हा त्रास सुरू होता. विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील सरपंच असलेल्या पत्नीच्या पतीने हस्तक्षेपातून प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपीच्या मदतीने पीडितेवर दबाव आणल्याचेही तक्रारदार महिलेने सांगितले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी ही परप्रांतीय आहे.
advertisement

दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणी सचिन उत्तम पुंदे, आनंदनाथ रामनाथ दराडे, रावसाहेब सुभान दराडे, मुनव्वरखान सरवरखान पठाण आणि अफरिजा पठाण या आरोपींच्या विरोधात IPC कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(2), 74, 115(2), 351(2) आणि पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12, 17 आणि 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
दुपारच्या सुट्टीत थांबवायचा अन्...परप्रांतीय चिमुरडीवर नराधम शिक्षकाचे अत्याचार; नगर हादरलं
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement