Work From Home चा एक फोन तुम्हाला करु शकतो कंगाल, हॅकर्सने शोधला फसवणूकीचा नवीन मार्ग

Last Updated:

वर्क फ्रॉम होम जॉबचे आमिष दाखवून महिलेचे बँक खाते रिकामे केल्याची नवीन घटना समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 17 डिसेंबर : कोविडपासून लोकांना वर्कफ्रॉम होमचा पर्याय मिळाला, ज्यानंतर लोकांना जाणू काही याची सवय लागली. घरातील कामांसोबत ऑफिसची कामे कशी करायची हे लोकांना समजले. ज्यामुळे बहुतांश लोक आजही वर्क फ्रॉम होम करु पाहतात. पण तुम्हाला माहितीय का की याता फायदा हॅकर्स घेत आहेत.
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांचे पैसे आणि डेटा चोरण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. ते फार हुशार असतात, ज्यामुळे संधी मिळेल तिथे ते आपलं कार्य सुरु करतात. हे हॅकर्स हॅकिंगसाठी संगणक, मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करतात आणि लोकांना गंडा घालतात.
वर्क फ्रॉम होम जॉबचे आमिष दाखवून महिलेचे बँक खाते रिकामे केल्याची नवीन घटना समोर आली आहे.
advertisement
एका महिलेच्या फोनवर एका कंपनीत नोकरीची संधी असल्याचा मेसेज आला. नोकरीसाठी दरमहा 40 हजार रुपयांपर्यंत पगार होता. महिलेने मुलाखत दिली आणि नोकरी मिळाली. त्यावेळी तिला नोकरीसाठी लिंक पाठवली गेली. लिंकवर क्लिक केल्यानंतर तिला एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. त्याला तिच्या बँकेची सर्व माहिती भरायची होती.
काही दिवसांनी महिलेचा एक फोन आला. फोन करणार्‍याने तिची बँकेची माहिती बरोबर नसल्याचे सांगितले. नोकरीसाठी तिला बँकेच्या माहितीची पडताळणी करावी लागेल अस देखील सांगितलं. महिलेचा मेसेज आला. मेसेजमध्ये एक ओटीपी होता. महिलेने ओटीपी टाकला. त्या महिलेला वाटले की ती तिच्या नोकरीसाठी हे सर्व करत आहे, जे गरजेचं आहे. पण तिला माहित नव्हतं की ती ठग्यांच्या कचाट्यात सापडली होती.
advertisement
कारण ओटीपी टाकल्यानंतर संध्याकाळी महिलेनं जेव्हा आपलं खातं तपासलं तेव्हा तिला कळालं की तिचं बँक खातं आता रिकामी झालं आहे. ज्यानंतर तिने पोलिसांना याबद्दल कळवले. पोलिस आता या घटनेचा तपास करत आहेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Work From Home चा एक फोन तुम्हाला करु शकतो कंगाल, हॅकर्सने शोधला फसवणूकीचा नवीन मार्ग
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement