धाराशिव: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात बडा मासा गळाला, भाजप नेत्याच्या आवळल्या मुसक्या

Last Updated:

Crime in Tuljapur: मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणी मोठी कारवाई केली असून बडा मासा गळाला लागला आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत आहे. फेब्रुवारी महिन्यात तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली. संबंधित तिघांची चौकशी केली असता, या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील व्यापकता समोर आली होती. पोलिसांनी मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. यात एक दोन नव्हे तर तब्बल ३६ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सोळा जणांना अटक केली आहे. अजून २० जण फरार आहेत.
आता याच प्रकरणात आता बडा मासा गळाला लागला आहे. पोलिसांनी एका भाजपच्या नेत्याला अटक केली आहे. संबंधित नेता मागील दीड महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आता अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
शरद जमदाडे असं अटक केलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.
advertisement
शरद जमदाडे याला तुळजापूर तालुक्यातील कामठा गावातून अटक केली आहे. तो तुळजापूर पंचायत समितीचा माजी उपसभापती आहे. मागील दीड महिन्यांपासून तो फरार होता. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आरोपी शरद जमदाडे विरोधात तालमवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जमदाडे फरार होता. अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 36 आरोपींची नावं समोर आली होती. यातील 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलं आहे. अद्याप 20 आरोपी फरार आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकर त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. ड्रग्ज प्रकरणात एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याने आता राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
धाराशिव: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात बडा मासा गळाला, भाजप नेत्याच्या आवळल्या मुसक्या
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement