Crime News : 6 वर्षांच्या मुलाच्या आईला लग्नाचं आमिष, प्रेमाच्या नावाखाली अत्याचार, वकिलावर गुन्हा दाखल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Crime News : शाळेतील ओळख, न्यायालयातील भेट, प्रेमसंबंध, सहजीवन आणि शेवटी फसवणूक पदरी आलेल्या महिलेकडे पोलिसांत धाव घेण्याशिवाय मार्गच उरला नाही
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शाळेतील मित्र असणार्या वकिलाने मैत्रीचा गैरफायदा घेत एका विभक्त महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील ओळख, न्यायालयातील भेट, प्रेमसंबंध, सहजीवन आणि शेवटी फसवणूक पदरी आलेल्या महिलेकडे पोलिसांत धाव घेण्याशिवाय मार्गच उरला नाही.
ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. अॅड. महेंद्र भगवान नैनाव या वकिलावर एका 27 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार व जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सिडको पोलीस ठाण्यात याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.
काय आहे प्रकरण?
advertisement
27 वर्षीय तक्रारदार तरुणी ही विवाहित असून पतीपासून विभक्त राहते. तिचा एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. महेंद्र नैनाव याच्याशी तिची ओळख शाळेपासून होती. मार्च 2025 मध्ये पाचोरा न्यायालयात कामाच्या निमित्ताने दोघांची पुन्हा भेट झाली. तक्रारीनुसार, ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली.
महेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखवत छत्रपती संभाजीनगरमधील विविध हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जून 2025 पासून त्यांनी जय भवानीनगर परिसरात एकत्र राहण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तरुणी गर्भवती राहिली. मात्र, महेंद्रने जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. 3 ऑगस्टपासून महेंद्रने तिच्याशी संपर्क तोडल्याने, अखेर त्रस्त होऊन संबंधित तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 05, 2025 9:37 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : 6 वर्षांच्या मुलाच्या आईला लग्नाचं आमिष, प्रेमाच्या नावाखाली अत्याचार, वकिलावर गुन्हा दाखल