170 कोटींचे व्यवहार झाले पण पैसे मिळालेच नाहीत! शेतकरी डिलिव्हरी बॉयला पाहून IT अधिकारी हैराण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Binance द्वारे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी, डिलिव्हरी बॉय यांच्या नावावर 170 कोटींचा क्रिप्टो घोटाळा उघड, पॅनकार्ड चोरी रॅकेटमुळे अधिकारी हैराण.
आजकाल फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. KYC, OTP असेल अनेक फंडे वापरून फ्रॉड होत आहे. मात्र आता एक वेगळाच घोटाळा समोर आला. हा गोंधळ पाहून आयकरचे अधिकारी देखील हैराण झाले आहेत. शेतकरी, डिलिव्हरी बॉय, कामगार यांनी लाखो रुपयांची उलाढाल केल्याचं दिसलं, त्यानुसार अधिकारी त्यांच्यापर्यंत चौकशीसाठी पोहोचले. मात्र तिथे गेल्यावर जे त्यांनी पाहिलं, जे ऐकलं त्यानंतर जबरदस्त धक्काच बसला.
प्रत्यक्षात शेतकरी, डिलिव्हरी बॉय, कामगार यांच्याकडे एकही रुपया यामधील नव्हता. तो पोहोचलाच नव्हता. त्यांच्या नावाने कोणीतरी कोट्यवधी रुपयांचा क्रेप्टो घोटाळा केला होता. ही रक्कम यांच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. हे सगळं पाहिल्यानंतर अधिकारी पुरते चक्रावले, त्यांनी या प्रकरणाचा शोध घेतला तर अशा 9 केस समोर आला आणि त्यातून 17 कोटी रुपयांची फसवणूक झाली, घोटाळा झाल्याचं समोर आलं.
advertisement
Foreign Investigation Unit उघड केलेल्या या प्रकरणात 170 कोटी रुपयांचे क्रिप्टो व्यवहार करण्यात आला, मात्र जेव्हा या गुंतवणूकदारांचा शोध घेतला गेला तेव्हा समोर आले शेतकरी आणि डिलिव्हरी बॉय! व्यवहार झालेत पण पैशांचा कुठेच मागमूस नाही, हे पाहून अधिकारीही अवाक झाले. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या माहितीनुसार, 20 संशयास्पद प्रकरणांचा मागोवा घेताना तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दुर्गम भागात तपास सुरू झाला.
advertisement
यापैकी सर्वात धक्कादायक प्रकरण सिद्दिपेट जिल्ह्यातील मिर्डोडी गावात उघडकीस आलं. Binance द्वारे तब्बल 9.5 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी खरेदी करणाऱ्या एका गुंतवणूकदाराला भेटण्यासाठी अधिकारी गेले. मात्र, गुंतवणूकदाराच्या ऐवजी त्यांना शेतात काम करणारे शेतकरी एस. नरसिम्हा भेटले. नरसिम्हांनी अधिकाऱ्यांना सांगितले, “माझ्या नावावर एवढ्या मोठ्या व्यवहाराची मला काहीच कल्पना नाही. यावरुन त्यांचं नाव वापरून घोटाळा केल्याचं उघडकीस आलं.
advertisement
डिलिव्हरी बॉयच्या नावावर 8.5 कोटींचे व्यवहार!
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, खम्मम जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपासासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आणखी एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं. शिवा पामुला नावाचा एक साधा फूड डिलिव्हरी बॉय 8.5 कोटी रुपयांच्या व्यवहारांचा मालक असल्याचं नोंदीत दिसत होतं. मात्र प्रत्यक्षात शिवाकडे एवढी गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता नव्हती.
advertisement
चोरीला गेले पॅनकार्ड, ‘ओळख चोरी’चा मोठा रॅकेट
या तपासातून समोर आले आहे की, सामान्य लोकांचे पॅन कार्ड आणि वैयक्तिक तपशील चोरून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो व्यवहारांसाठी केला गेला आहे. या रॅकेटचं जाळं हैदराबाद, सिद्दिपेट, खम्मम, जगतियाल, सत्तूपल्ली आणि विजयवाडा अशा अनेक जिल्ह्यांपर्यंत पसरलेलं आहे. अनेक व्यक्ती आयकर रिटर्न भरत नसतानाही त्यांच्या नावावर कोट्यवधींचे व्यवहार झालेले दिसून आले आहेत, ज्यामुळे ही गुंतवणूक बेकायदेशीर असल्याचं आणखी स्पष्ट होतं.
advertisement
काही प्रमुख प्रकरणे जी थक्क करणारी आहेत
हैदराबादमधील एका पाणी प्लांट कर्मचाऱ्याच्या नावावर 34.7 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहोत. सत्तूपल्लीतील एका शेतकऱ्याच्या नावावर 31 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खम्मममधील एका औषधनिर्मिती कर्मचाऱ्याच्या नावावर 19.6कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. हा घोटाळा आणखी कुठपर्यंत घेऊन जातोय याचा तपास सुरू आहे. सर्वसामान्य लोकांची माहितीचा गैरवापर करुन असे प्रकार होत आहेत. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 26, 2025 10:37 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
170 कोटींचे व्यवहार झाले पण पैसे मिळालेच नाहीत! शेतकरी डिलिव्हरी बॉयला पाहून IT अधिकारी हैराण