नेहमी घरी यायचा बॉयफ्रेंड, सासूने केला विरोध, सुनेने आला राग, करुन टाकलं हादरवणारं कांड, 10 दिवसांनी सत्य समोर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - नाजियाचे गावातीलच रोमी नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. घरी फक्त सासू आणि सून राहत होते. याचाच फायदा घेत नाजियाचा प्रियकर नेहमी तिला भेटायला घरी यायचा.
आदित्य आनंद, प्रतिनिधी
गोड्डा - गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेने जे केले त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुनेने प्रियकराच्या मदतीने आपल्या सासूची हत्या केली आणि मृतदेहाला घराच्या सेप्टिक टँकमध्येच टाकले.
advertisement
नूरजहां असे मृत सासूचे नाव आहे. तर नाजिया शहर असे आरोपी सुनेचे नाव आहे. झारखंडच्या गोड्डा येथील मेहरमा पोलीस ठाणे हद्दीतील बरारी गावात ही धक्कादायक घटना घडली. नाजिया हिचा पती मो. आजम रजा याने सांगितले की, तो काही महिन्यांपासून मुंबईत मजुरीच्या काम करत होता. याआधीही तो कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहायचा. यातच त्याच्या पत्नीचे गावातीलच रोमी नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. याबाबत तिच्या पतीला काही दिवसांपूर्वीच माहिती झाली होती. या घटनेवरुन घरात वादही झाला होता.
advertisement
मो. आजम आणि नाजिया यांना दोन मुलेही आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने ते घराबाहेर राहतात. तर घरी फक्त सासू आणि सून राहत होते. याचाच फायदा घेत नाजियाचा प्रियकर नेहमी तिला भेटायला घरी यायचा. या प्रकाराला नाजियाची सासू नेहमी विरोध करायची. याचाच राग मनात धरुन नाजिया हिने आपला प्रियकर रोमी याच्या मदतीने सासूवर विटेने वार करत तिची हत्या केली.
advertisement
आजम याने पुढे बोलताना सांगितले की, 24 ऑक्टोबर रोजी मुंबईतून जेव्हा त्याने आपल्या पत्नीला फोन करुन आईबाबत विचारले तर त्या भांडण करुन आपल्या भावाच्या घरी निघून गेल्या, असे तिने सांगितले. मात्र, अनेक दिवस आईसोबत बोलणं न झाल्याने भागलपूर येथे शिकणाऱ्या आपल्या मुलाला घरी पाठवले. यानंतर नाजिया हिने आपल्या मुलाला सर्व सत्य घटना सांगतली आणि आजमलाही या सर्व घटनेची माहिती मिळाली.
advertisement
यानंतर आजम मुंबईतून घरी पोहोचला. मात्र, इकडे त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तपासात शनिवारी रात्री उशिरा घरातीलच सेप्टिक टँकमधून नूरजहा यांचा मृतदेह आढळून आला. 10 दिवसांनी या घटनेचे सत्य समोर आले. यानंतर या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी चंद्रशेखर आझाद यांनी दिली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Jharkhand
First Published :
November 04, 2024 9:02 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नेहमी घरी यायचा बॉयफ्रेंड, सासूने केला विरोध, सुनेने आला राग, करुन टाकलं हादरवणारं कांड, 10 दिवसांनी सत्य समोर