अफेअर ठरलं कारण, तरुणीच्या कुटुंबीयांनी केला घात, तरुणासोबत घडलं भयानक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - टीकराम आणि गावातील तरुणी गीता यादव यांचे प्रेमसंबंध होते. 2 नोव्हेंबर 2024 रोजी तो आपला मित्र दीपक वर्मासह दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकीवर निघाला होता.
सूर्यप्रकाश सूर्यकांत, प्रतिनिधी
बिलासपुर : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच पती पत्नीच्या वादाच्याही अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिलासपूर जिल्ह्यातील चिल्हाटी गावात एका तरुणाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. टीकाराम केवट असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कसडोल परिसरातील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीला भेटायला गावी आला होता. टीकाराम आणि त्याची प्रेयसी गीता या दोघांच्या प्रेमसंबंधांवरुन गीता हिचे कुटुंबीय रागावलेले होते. त्यामुळे त्यांनी गीताला त्यांचे नातेवाईक भागवत यादव यांच्या घरी दिघोरा येथे पाठवले. याच प्रेमसंबंधावरुन गीताच्या कुटुंबीयांनी टीकाराम याची हत्या करण्याचा कट रचला. आखलेल्या कटानुसार, त्याला आधी त्यांनी जोरदार मारहाण केली आणि मग गळा दाबून त्याची हत्या केली, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
advertisement
टीकराम आणि गावातील तरुणी गीता यादव यांचे प्रेमसंबंध होते. 2 नोव्हेंबर 2024 रोजी तो आपला मित्र दीपक वर्मासह दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकीवर निघाला होता. मात्र, आरोपींनी या दोघांना जंगलात पकडून त्यांच्यावर हल्ला केला. तर दीपकने तेथून कसाबसा जीव वाचवून पळ काढला. मात्र, टीकाराम तिथेच त्यांच्या ताब्यात सापडला आणि त्यांनी त्याला जोरदार मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केली. सुखी राम यादव, भोजराम यादव, गौरी शंकर यादव, ललित यादव, राहुल यादव आणि भागवत यादव अशी आरोपींची नावे आहेत.
advertisement
दरम्यान, पोलीस अधीक्षक रजनेश सिंह यांनी दिलेल्या आदेशावरुन तत्काळ कार्यवाही करत पोलिसांनी हत्येच्या आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपास आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Location :
Bilaspur,Chhattisgarh
First Published :
November 04, 2024 7:35 PM IST