‘लॅारेन्स बिश्नोई’ने ‘सलमान’, ‘शाहरुख’लाही टाकलं मागे, कतरिनाही फेल, 1 लाख 25 हजार मिळाला भाव!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
donkey bazar - नुकतीच मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली आहे. या घटनेनंतर भारतात बिश्नोई या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे.
विकास कुमार, प्रतिनिधी
चित्रकूट : भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या यात्रा भरतात. काही ठिकाणी प्रसिद्ध असा घोड्यांचा बाजारही भरतो. मात्र, एक ठिकाण असे आहे, जिथे गाढवांचा बाजार भरतो आणि हिंदी चित्रपटातील कलाकरांच्या नावाने गाढवांवर बोलीही लावली जाते. याच बाजाराबाबत आपण जाणून घेणार आहोत.
गाढवांसाठी भरणारा हा भारतातील एकमेव असा बाजार आहे. तसेच हा बाजार अत्यंत जुना आणि विशेष आकर्षण आहे. दूरदूरवरुन पर्यटक याठिकाणी बाजार पाहायला मोठ्या संख्येने लोक येतात. तसेच दूरदूरवरुन व्यापारी या बाजारात आपले गाढव घेऊन येतात. त्यांच्यावर बोली लावली जाते. चित्रकूटमधील मंदाकिनी नदीच्या तटावर हा बाजार भरतो.
advertisement
आयोजक काय म्हणाले -
या बाजाराचे आयोजक रमेश पांडे म्हणाले की, हा ऐतिहासिक बाजार आहे. औरंगजेबाच्या काळापासून हा बाजार भरतो. औरंगजेब चित्रकूटला आला होता तेव्हा त्याचे सैन्य याच ठिकाणी राहिले. त्याकाळी वाहनांची कोणतीही सोय नसल्याने त्याचे सैनिक, दारूगोळा व इतर सामानाची वाहतूक या गाढवांच्या माध्यमातून व्हायची. तेव्हापासून येथे दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गाढवांचा बाजार भरतो.
advertisement
दरम्यान, नुकतीच मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली आहे. या घटनेनंतर भारतात बिश्नोई या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. याच कारणामुळे या गाढव बाजारातील सर्वात महागडे गाढव त्याच्या नावावर विकले गेले आहे.
advertisement
चित्रकूटमध्ये हा तीन दिवसीय गाढवांचा बाजार भरतो. या बाजाराची एक विशेष ओळख अशी आहे की, याठिकाणी कलाकारांच्या नावाने गाढवांची नावे ठेवली जातात. मागच्या वर्षी बॉलिवूड कलाकारांच्या नावावर गाढवांची विक्री झाली. जसे की, सलमान खान, शाहरुख खान, कतरिना कैफ. यावेळी 'लॉरेन्स' नावाचे गाढवाची सर्वात जास्त पैशांत विक्री झाली. 'लॉरेन्स' नावाचे गाढव 1 लाख 25 हजार रुपयांना विकले गेले. तर सलमान आणि शाहरुख नावाच्या गाढवाची किंमत यापेक्षा खूपच कमी आहे.
advertisement
शाहरुख, सलमानला किती किंमत मिळाली -
बाजाराचे आयोजक रमेश यांनी सांगितले की, यावेळी या बाजारात सर्वात महाग लॉरेन्स बिश्नोई 1 लाख 25 हजार रुपये, त्यानंतर शाहरुख खान 75 हजार रुपये, सलमान 85 हजार रुपये आणि बसंतीची विक्री झाली. यावेळी सुमारे 500 गाढव या बाजारात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Location :
Chitrakoot,Uttar Pradesh
First Published :
November 04, 2024 4:32 PM IST
मराठी बातम्या/Viral/
‘लॅारेन्स बिश्नोई’ने ‘सलमान’, ‘शाहरुख’लाही टाकलं मागे, कतरिनाही फेल, 1 लाख 25 हजार मिळाला भाव!