'मी पिस्तुल मागवतोय, आता 3 खून होतील', तरुणाची डॉक्टरांना धमकी, धक्कादायक घटना

Last Updated:

crime news - माथेफिरू तरुणाने तीन डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा 50 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मी आता माझी पिस्तूल आणि रिवॉल्व्हर मागवत आहे आणि तीन खून करणार आहे, असे त्याने सांगितले.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
व्यंकटेश भार्गव, प्रतिनिधी
ग्वाल्हेर : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विविध व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणाने दोन डॉक्टरसह मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
काय आहे प्रकरण -
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार समोर आला. एका माथेफिरू तरुणाने मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.सचिन श्रीवास्तव, महिला वैद्यकीय अधिकारी बिंदू सिंघल आणि हजिरा सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत नायक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जगजीत राजावत असे या माथेफिरु तरुणाचे नाव आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेनंतर डॉक्टर संघटनेने पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठून घटनेची तक्रार दिली. तसेच अशा लोकांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
माथेफिरू तरुणाने तीन डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा 50 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मी आता माझी पिस्तूल आणि रिवॉल्व्हर मागवत आहे आणि तीन खून करणार आहे. यामध्ये पहिला खून डॉ. प्रशांत नायक, दुसरा खून डॉ. बिंदू सिंघल आणि तिसरा खून मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचा असेल, असे सांगताना तो दिसत आहे.
advertisement
धमकी देणाऱ्या या तरुणाच्या आईला काही दिवसांपूर्वी हजीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्या आईवर योग्यप्रकारे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना सुट्टीही देण्यात आली. यानंतर त्याने मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, डॉक्टर असोसिएशनच्या तक्रारीवरुन माथेफिरु तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'मी पिस्तुल मागवतोय, आता 3 खून होतील', तरुणाची डॉक्टरांना धमकी, धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement