मध्यरात्री GF ला घराबाहेर बोलवून ठेवले बळजबरी संबंध, नंतर मित्रांच्या केलं हवाली, सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला!

Last Updated:

Crime in Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केला आहे.

News18
News18
Boyfriend And His Friend Sexual Assault Minor in Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत, बळजबरीने आळीपाळीने अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. यानंतर तिन्ही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची एका तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत मुलाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. १६ जून रोजी मुलीचे वडील शेतात गेले होते. यावेळी घरी आई, बहीण आणि भाऊ होते. घटनेच्या रात्री १२ वाजता प्रियकर पीडित तरुणीच्या घरात घुसला. ‘तू माझ्याबरोबर चल, मला तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायचं आहे’, अशी बतावणी करून तो पीडितेला घेवून गेला. तेव्हा आरोपीचा एक मित्र त्याच्यासोबत होता.
advertisement
दोघंही तरुणीला घेऊन जवळे दुमाला रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये गेले. या ठिकाणी आरोपीचा दुसरा मित्र होता. इथं जाताच मुलीने लग्नाबद्दल लवकर बोल, मला घरी जायचं आहे, असं प्रियकराला सांगितलं. पण प्रियकराने तिला जाऊ दिलं नाही. तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने माझ्या मित्रांना देखील तुझ्यासोबत शरीर संबध ठेवू दे, अशी मागणी केली. प्रियकराची ही मागणी ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आरोपीच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला.
advertisement
पण आरोपीने माझ्या मित्रांना शारीरिक संबध ठेवू दे, नाहीतर तुझ्या वडिलांना, चुलत्यांना जिवंत मारुन टाकेन, अशी धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या मुलीवर तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितलेस तर घरच्यांना जीवे मारुन टाकेन अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी मुलीला घरी आणून सोडलं. घाबरून पीडित मुलीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. पण नंतर तिने या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली.
advertisement
मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकून त्यांनी तातडीने ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
मध्यरात्री GF ला घराबाहेर बोलवून ठेवले बळजबरी संबंध, नंतर मित्रांच्या केलं हवाली, सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement