धाराशिव हादरलं! भरचौकात थरार, पती-पत्नीवर सपासप वार; बाप-लेकाने मिळून केली हत्या, वाचा सविस्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शेतीच्या वादावरून धाराशिवमध्ये भररस्त्यात पती-पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. करजखेडा गावातील सहदेव पवार आणि प्रियंका पवार हे कामानिमित्त...
छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या वादावरून धाराशिवमध्ये भररस्त्यात पती-पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. करजखेडा गावातील सहदेव पवार आणि प्रियंका पवार हे कामानिमित्त पाटोदा चौरस्ता येथून त्यांच्या बाईकवरून जात होते. हरिबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा जीवन चव्हाण यांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. पती-पत्नी खाली पडताच दोघा बाप-लेकांनी कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात पत्नी पत्नी प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, पती सहदेव याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
भररस्त्यात हत्या झाली, पण कुणीही पुढे आलं नाही
करजखेडा येथील सहदेव पवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होता. या गुन्ह्यात तो 4 वर्षे शिक्षा भोगत होता. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. गावी आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवून हरिबा चव्हाण आणि जीवन चव्हाण यांनी त्याच्यावर हल्ला केला. भर चौकात ही हत्या झाली, पण त्यांच्यातील भांडण सोडवण्यास कुणीही पुढे आलं नाही.
advertisement
शेतीवरून सुरू झाला होता वाद
समोर आलेली माहिती अशी की, सहदेव पवार आणि हरिबा चव्हाण यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. पुढे वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हरिबा चव्हाण यांच्या तक्रारीवरून सहदेव पवार याच्याविरुद्ध 307 चा गुन्हा दाखल झाला होता. 4 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर भररस्त्यात त्यांच्या गाडीला धडक देत पती-पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना आरोपींचा शोध सुरू आहे. पण भररस्त्यात पती-पत्नीची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
हे ही वाचा : 'आई पत्नीसारखी वाटते, किस केलं...', संतापलेल्या बापाने केला मुलाचा मर्डर, बॉडी नदीत फेकली
हे ही वाचा : Mumbai Crime : नवऱ्याला घरातच संपवण्याचा कट,पण बायको, प्रियकर आणि भाऊ तिंघाच बिंग लेकीनं फोडलं, भयंकर घटना
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
धाराशिव हादरलं! भरचौकात थरार, पती-पत्नीवर सपासप वार; बाप-लेकाने मिळून केली हत्या, वाचा सविस्तर


