advertisement

Amravati Crime: बापाची दारू पोरानं ढोसली, नात्याचा रक्तरंजित शेवट, झोपेतच खेळ खल्लास

Last Updated:

Crime in Amravati: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पोटच्या लेकाचा निर्घृण खून केला आहे.

AI generated Photo
AI generated Photo
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पोटच्या लेकाचा निर्घृण खून केला आहे. हा खून जमीन किंवा संपत्तीच्या वादातून नव्हे, तर दारुच्या वादातून केला आहे. मयत मुलाने बापाने आणलेली दारू प्यायला होता. याच कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दारुच्या घोटासाठी मुलाला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
हिरामण धुर्वे असं आरोपी बापाचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील बहादा गावात आपल्या कुटुंबासमवेत राहातो. आरोपी धुर्वेला मागील अनेक वर्षांपासून दारुचं व्यसन आहे. त्याचा ३२ वर्षीय मुलगा हाही गेल्या काही काळापासून दारुच्या आहारी गेला आहे. बापलेकही दारुच्या आहारी गेले होते. यातूच धुर्वेनं आपल्या पोटच्या मुलाला संपवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी हिरामण धुर्वे याने स्वत:ला प्यायला दारू आणली होती. घरी आल्यानंतर त्याने एकेठिकाणी दारू ठेवली. ही बाब मुलाला समजल्यानंतर त्याने वडिलांच्या नकळत दारू ढोसली. दारु प्यायल्यानंतर मुलगा घरात झोपी गेली. दुसरीकडे, बापाने दारुची शोधाशोध सुरू केली. यावेळी आपण आणलेली दारू मुलगा प्यायला, अशी माहिती बापाला मिळाली.
advertisement
याबाबत आरोपी बापाने आपल्या मुलाला जाब विचारला. दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर बापलेकांमध्ये हाणामारी झाली. या वादानंतर ३२ वर्षीय मुलगा घरात झोपी गेला. यावेळी संतापलेल्या पित्याने झोपलेल्या आपल्या मुलाच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार वार केला. हा वार वर्मी लागून मुलगा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. घोटभर दारुसाठी बापानेच मुलाची अशाप्रकारे हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Amravati Crime: बापाची दारू पोरानं ढोसली, नात्याचा रक्तरंजित शेवट, झोपेतच खेळ खल्लास
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement