जळगावची गायत्री पाटील निघाली 'कातील', अपहरण, 2 लाखांत विक्री अन् जबरदस्ती विवाह प्रकरणाला वेगळं वळण

Last Updated:

काही दिवसांपूर्वी जळगावात एका तरुणीचं अपहरण करून तिची दोन लाखांत विक्री केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.

भैय्या पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, लग्नाच्या बनावात बापाचा बळी, मुलीवरच फसवणुकीचा गुन्हा!
भैय्या पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, लग्नाच्या बनावात बापाचा बळी, मुलीवरच फसवणुकीचा गुन्हा!
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: काही दिवसांपूर्वी जळगावात एका तरुणीचं अपहरण करून तिची दोन लाखांत विक्री केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. नोकरी देण्याच्या बहाण्याने नाशिकला नेलं, अन् कोल्हापुरात विक्री केली. जबरदस्ती लग्न लावून अत्याचार केला. यानंतर तिचा गर्भपात केल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. मुलीवर झालेल्या कथित अत्याचारामुळे अस्वस्थ झालेले वडील भैय्या पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
या प्रकरणातील कथित पीडित तरुणी गायत्री पाटील हीच आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर तिची कुठेच विक्री झाली नव्हती. उलट आरोपी गायत्री हीच एका टोळीशी संगनमत करून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गायत्रीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गायत्री पाटीलला ताब्यात घेतलं आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी जळगावमधील गायत्री पाटील या तरुणीला नोकरीच्या बहाण्याने नाशिक येथे घेऊन जात दोन महिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर येथे दोन लाखांत विक्री करून बळजबरी विवाह केल्याची घटना समोर आली होती. या घटनेच्या धक्क्याने गायत्री पाटीलचे वडील भैया पाटील यांनी आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट समोर आले असून या घटनेची वस्तुस्थिती ही वेगळी असल्याचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
लग्नाचा बनाव करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये गायत्री आणि तिच्या आईचाही सहभाग असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान वडिलांच्या आत्महत्येपासून बेपत्ता असलेल्या गायत्रीला पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेतले असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गायत्री आणि तिच्या आईची रूपाली चाकणकर यांच्याकडून चौकशी करण्यात आली.

चार ठिकाणी लग्न करून अनेकांची फसवणूक

advertisement
या संपूर्ण घटनेत पोलीस तपासात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले. गायत्रीने लग्नाचा बनाव करून एका टोळीशी संगनमत करत पुणे परभणी कोल्हापूर आणि जळगाव येथे चार ठिकाणी विवाह करून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती ही पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात गायत्री पाटीलसह तिची आई मनीषा पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
जळगावची गायत्री पाटील निघाली 'कातील', अपहरण, 2 लाखांत विक्री अन् जबरदस्ती विवाह प्रकरणाला वेगळं वळण
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement