बॉयफ्रेंडच्या ऑफिसबाहेर 20 वर्षीय तरुणीने स्वत:लाच पेटवलं, कारण फारच भयंकर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : प्रेम प्रकरणातून कधीकधी अशी काही धक्कादायक प्रकरणं समोर येत असतात की, त्याबद्दल जाणून आपल्यालाच धक्का बसतो. असंच एक प्रकरण सध्या राज्यस्थानमधून समोर आलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजस्थानमधील एका 20 वर्षीय तरुणीने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं.
या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे बोलले जात आहे.
तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मात्र तरुणीने त्याला लग्नासाठी विचारल्यावर तरुणाने तिच्याशी संबंध तोडले. शिवाय तिचा फोन नंबरही ब्लॉक केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगढ टाऊनमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने सोमवारी एका खासगी रुग्णालयासमोर स्वत:वर पेट्रोल शिंपडून पेटवून घेतलं. घटनास्थळी उपस्थित लोकांनी कशीतरी आग विझवली. तेथून तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच उपचार करून मुलीचे प्राण वाचवले आहे, मात्र अजूनही तिच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
याबाबत डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्याने मुलीला याचे कारण विचारले. पीडितेने सांगितले की, तिचे हनुमानगढ शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाने तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंधही ठेवलं होतं. मात्र मुलीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तो उलटा फिरला.
तरुणाने तरुणीचा फोन नंबर ब्लॉक केला. यामुळे तरुणी इतकी दुखावली गेली की ती तिचा बॉयफ्रेंड काम करत असलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर गेली. तिथे तिने सर्वांसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
पोलिस अधीक्षक राजीव प्रचार यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीने जे काही म्हणणे मांडले त्याआधारे पुढील तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2024 2:33 PM IST


