कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बापानेच पुसलं लेकीचं कुंकू, 'ऑनर किलिंग'च्या घटनेने खळबळ! मुलीच्या डोळ्यासमोर रक्ताचा सडा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Darbhanga honor killing in DMCH campus : आंतरजातीय विवाह केल्याने बापाने मुलीच्या डोळ्यासमोर जावयाच्या छातीत गोळी मारली आणि लेकीचं कुंकू पुसलं आहे.
Darbhanga Nursing Student Shot : मंगळवारी संध्याकाळी दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका 25 वर्षीय नर्सिंग विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे सध्या दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मुलीच्या वडिलांनी मुलीच्या डोळ्यासमोर मुलाच्या छातीत गोळी झाडली. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या
कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न
पीडित राहुल कुमार, डीएमसीएचमध्ये बीएससी नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी, याला रुग्णालयाच्या आवारात अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. कथित हल्लेखोर प्रेमशंकर झा हा राहुलची पत्नी तन्नू प्रियाचा वडील आहे, जी त्याच कॉलेजमध्ये प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. या जोडप्याने चार महिन्यांपूर्वी तन्नूच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. आंतरजातीय विवाह असल्याने तन्नूच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता.
advertisement
पत्नीने सांगितला घटनाक्रम
मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली. त्याच्याकडे बंदूक होती. ते माझे वडील प्रेमशंकर झा होते. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीच्या छातीत गोळी झाडली. माझा पती माझ्या मांडीवर पडला होता, असं पत्नी तन्नूने भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं. गोळीबारानंतर, संतप्त विद्यार्थी आणि वसतिगृहातील रहिवाशांनी झा यांना पकडून त्यांच्यावर हल्ला केला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी त्यांना मारहाण केली.
advertisement
पोलिस बंदोबस्त तैनात
दरम्यान, दरभंगाचे जिल्हा दंडाधिकारी कौशल कुमार आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) जगन्नाथ रेड्डी यांच्यासह जिल्हा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पुढील अशांतता टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर आता राहुलसाठी त्वरित न्यायाची मागणी केली जात आहे.
Location :
Bihar
First Published :
August 06, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बापानेच पुसलं लेकीचं कुंकू, 'ऑनर किलिंग'च्या घटनेने खळबळ! मुलीच्या डोळ्यासमोर रक्ताचा सडा