नवरा कामाला गेला अन् घरी सुनेनं सासूला मारून गोणीत भरलं, जालन्यातील घटना
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जालन्यामध्ये सुनेनं सासूची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सून प्रतिक्षा शिनगारे हिने पहाटे आपली सासू सविता हिचे डोके भिंतीवर आपटून खून केला आणि त्यानंतर मृतदेह गोणीत कोंबून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला हे कृत्य पूर्ण करता आले नाही आणि ती पहाटे फरार झाली.
जालना : जालन्यामध्ये सुनेनं सासूची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत एका सुनेनं आपल्या सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरल्याची घटना बुधवारी 2 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सून प्रतिक्षा शिनगारे हिने पहाटे आपली सासू सविता हिचे डोके भिंतीवर आपटून खून केला आणि त्यानंतर मृतदेह गोणीत कोंबून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला हे कृत्य पूर्ण करता आले नाही आणि ती पहाटे फरार झाली.
शिनगारे कुटुंब हे प्रियदर्शनी कॉलनीत भाड्याने राहते. सहा महिन्यांपूर्वी आकाश संजय शिनगारे (मूळ गाव: वावरे अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) यांचा परभणी येथील प्रतिक्षा हिच्याशी विवाह झाला होता. आकाश हा खासगी नोकरीसाठी लातूर येथे राहतो, तर प्रतिक्षा ही आपल्या सासू सविता यांच्यासोबत जालन्यात राहत होती. आज पहाटे घडलेल्या या भयंकर घटनेत प्रतिक्षाने सासूचा जीव घेतला आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही.
advertisement
प्रतिक्षा ही पहाटे 5:28 वाजता घरातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती एका साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून पळून गेली असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तैनात केली आहेत. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रतिक्षा आणि तिच्या साथीदाराचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सासू-सुनेतील वादाचे कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सुनेला परभणी येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 3:26 PM IST








