advertisement

कुत्र्यांसाठी घसरगुंडी, स्विमिंग पूल अन् हॉस्टेल, महाराष्ट्रात या ठिकाणी उभारलं डॉग पार्क

Last Updated:

अपार्टमेंटमध्ये काही नियम असल्याने आपल्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला मुक्त संचार करण्यासाठी जागा नसते. याचा विचार करून नाशिकमधील पवार कुटुंबियांनी नवीन संकल्पनेतून डॉग पार्क पहिल्यांदाच पाच एकरात नाशिकमधील पिंपळगाव बहुला या ठिकाणी उघडले आहे.

+
News18

News18

नाशिक : अलीकडच्या काळात कुत्रा आणि मांजर पाळण्याचा ट्रेंड सध्या सर्वत्र सुरू आहे. फक्त त्यांना पाळणेच नाही तर जीव देखील घरातल्या लहान मुलांसारखा लावला जात असतो. त्यांच्या गरजा पुरविणे, वस्तू आणणे सर्व लाड हे हौसेने पालकांकडून केले जात असतात. अनेक ठिकाणी प्राण्यांना घेऊन येण्यास परवानगी नसते. यामुळे त्यांना मोकळेपणाने वावरता येत नाही. अलीकडे बरेच लोक हे अपार्टमेंटमध्ये राहत असतात. परंतु अपार्टमेंटमध्ये काही नियम असल्याने आपल्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला मुक्त संचार करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे हेच पाळीव प्राणी घरात राहून राहून चिडचिडे होत असतात. याचा विचार करून नाशिकमधील पवार कुटुंबियांनी नवीन संकल्पनेतून डॉग पार्क पहिल्यांदाच पाच एकरात नाशिकमधील पिंपळगाव बहुला या ठिकाणी उघडले आहे.
शैलजा, चंद्रशेखर आणि त्यांची मुलगी उमा पवार यांनी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याच्या गरजा समजून घेत हा नवीन उपक्रम इतर पाल्यांसाठी खुला केला आहे. उमा पवार यांना घरात श्वान पाळण्याची आवड आहे. एक वेळेस त्यांना काही कारणास्तव बाहेर गावी जाण्याची गरज पडली त्या वेळी त्यांच्या या श्वानाला कुठे ठेवावे असा प्रश्न पडल्यानंतर आपण काही तरी यांच्यासाठी कराव काआपल्याला आलेली अडचण अनेक पेट्स पॅरेंट्सना येत असणार या करता घरात ही संकल्पना सांगितल्यानंतर सर्वांनी या विचाराचे समर्थन केले असता त्यांनी त्यांच्या पिंपळगाव बहुला या भागात डॉग पार्क उघडले असल्याचे शैलजा पवार यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
काय आहे पार्कचे वैशिष्ट्ये?
यांच्या डॉग पार्क मध्ये कुत्र्यांना खेळण्यासाठी प्रशस्त असे ग्रिन लॉन आहे. तसेच त्यांना मोकळेपणाने खेळता यावे या करता मोकळी जागा देखील आहे. त्याच बरोबर घसरगुंडीकुत्र्यांना उंचावरून वाटणारी भीती घालवण्यासाठी वेगवेगळे खेळणीत्यांच्यासाठी स्पेशल स्विमिंग पूलअसे बरेचशे खेळणी यांनी त्यांच्या या डॉग पार्कमध्ये ठेवल्या आहेत.
advertisement
तसेच तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची वेळ आली आणि तुम्ही तुमच्या पेट्सना कुठे ठेवू या विचारात असाल तर या प्रश्नावर देखील यांनी तोडगा काढून कुत्र्यांसाठी हॉस्टेल देखील बनविले आहे. आपण आपल्या पेट्सना यांच्या या हॉस्टेलमध्ये ठेऊन आपले काम करून येऊ शकता. यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे अनेक पेट्स पॅरेंट्स यांच्यामुळे टेन्शन फ्री झाल्याचे दिसत आहे.
advertisement
कुठे आहे डॉग पार्क?
तुम्ही तुमच्या कुत्र्यांना आणि कुठल्याही पाळीव प्राण्यांना यांच्या या पार्कमध्ये घेऊन जाण्यास इच्छुक असतील तर हे डॉग पार्क नाशिक येथील सातपूर पासून पाच किलोमीटर वर असलेल्या पिंपळगाव बहुला या गावापासून वसडीया गावात सेंट थॉमस शाळेच्या बाजूला यांचे हे डॉग फार्म आहे.
view comments
मराठी बातम्या/नाशिक/
कुत्र्यांसाठी घसरगुंडी, स्विमिंग पूल अन् हॉस्टेल, महाराष्ट्रात या ठिकाणी उभारलं डॉग पार्क
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement