Sonam Raghuvanshi : मनाविरुद्ध लग्न मग घटस्फोट न घेता का संपवलं राजाला? सोनमबद्दल समोर आलं हादरवणारं सत्य

Last Updated:

indore couple : मनाविरुद्ध लग्न झालं तरी घटस्फोटाचा पर्याय असताना देखील सोनमने राजाची हत्या का केली, याचा धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

घटस्फोट न घेता का संपवलं राजाला? सोनमबद्दल समोर आलं हादरवणारं सत्य
घटस्फोट न घेता का संपवलं राजाला? सोनमबद्दल समोर आलं हादरवणारं सत्य
इंदूर: मेघालयातील शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासात नवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. राजा रघुवंशीची हत्या सुपारी देऊन केली असल्याचे समोर आले आहे. सुपारी घेणारे हल्लेखोर राजाचा काटा काढण्यास अपयशी ठरले असते तरी त्याला ठार करायचा चंग सोनमने बांधला होता. मनाविरुद्ध लग्न झालं तरी घटस्फोटाचा पर्याय असताना देखील सोनमने राजाची हत्या का केली, याचा धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
मेघालय पोलिसांच्या तपासात राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट उघड झाला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी दोन इंदोरमधून आणि एक उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथून अटक करण्यात आली. तर या आरोपींनी सोनमसमोर आम्ही राजाला मारल्याची कबुली दिली.
हनिमूनसाठी शिलाँग गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला होता. तर, सोनमचा थांगपत्ता लागला नव्हता. 23 मे पासून राजा बेपत्ता होता. तर, 2 जून रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात राजाची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोनम बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. पोलिसांकडून सोनमचा शोध सुरू होता. अखेर तिने घरच्या लोकांना फोन करून गाझियाबादमधील आपलं लोकेशन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत तिला अटक केली.
advertisement

राजवर प्रेम तरी राजाचा काटा काढला...

राज कुशवाहसोबत सोनमचे प्रेम प्रकरण सुरू होते. सोनमचा विवाह हा तिच्या मनाविरुद्ध झाला असल्याचे म्हटले जात होते. सोनमने सुहागरात आणि हनिमूनला पती राजा रघुवंशीला शरीर संबंध ठेवू दिले नाही. वेगवेगळ्या कारणाने तिने त्याला दूर ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सोनमच्या मनाविरुद्ध लग्न झाले असले तरी तिच्यासमोर घटस्फोटाचा पर्याय होता. मात्र, तिने हा पर्याय निवडला नाही. त्याचे हादरवणारे कारण समोर आले आहे.
advertisement

...म्हणून घटस्फोट घेण्याऐवजी राजाला कायमचं संपवलं...

सोनमच्या पुत्रिकेत मंगळचा दोष होता. सोनमच्या पालकांनी विवाहपूर्वी मंगळाची पूजा घातली होती. त्यानंतर सोनमचा विवाह लावून देण्यात आला. कडक मंगळ असल्याच्या कारणाने सोनमने राजाची हत्या केली. राजाची हत्या केल्याने सोनम विधवा झाली आणि विधवा म्हणूनच ती प्रियकर राज कुशवाह सोबत दुसरं लग्न करणार होती. मंगळाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी सोनमने राजाची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuvanshi : मनाविरुद्ध लग्न मग घटस्फोट न घेता का संपवलं राजाला? सोनमबद्दल समोर आलं हादरवणारं सत्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement