रोहित शर्मा मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचला, हिटमॅनला काय झालं? चाहते घाबरले, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सोमवारी मध्यरात्री अचानक मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये पोहोचला, याचा व्हिडिओही समोर आला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सोमवारी मध्यरात्री अचानक मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये पोहोचला, याचा व्हिडिओही समोर आला आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते घाबरले आहेत, तसंच रोहितला काय झालं? असा प्रश्न विचारत आहेत. या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर रोहितला काय झालं? असं विचारत आहेत, पण या प्रश्नांची उत्तरं न देता रोहित हॉस्पिटलमध्ये गेला.
रोहित शर्मा नेमका रुग्णालयामध्ये का गेला? याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 19 ऑक्टोबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरिज खेळणार आहे. या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मासह विराट कोहलीही मैदानात दिसणार आहेत. आयपीएल 2025 च्या फायनलनंतर दोन्ही खेळाडू क्रिकेटपासून लांब आहेत, तसंच दोघांनी भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला.
advertisement
advertisement
रोहित शर्माने पास केली टेस्ट
काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्मा बंगळुरूमधल्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी गेला होता. या फिटनेस टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाल्याचं समोर आलं आहे. रोहितने आधीच आंतरराष्ट्रीय टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो भारताकडून फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहे.
advertisement
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याआधी 38 वर्षांच्या रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहितने 67 टेस्ट मॅचमध्ये 40.58 च्या सरासरीने 4,301 रन केले, ज्यामध्ये 12 शतकांचा समावेश होता. याआधी मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मधूनही निवृत्ती घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्मा मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचला, हिटमॅनला काय झालं? चाहते घाबरले, Video