jalna Crime: सासू साखर झोपेत असताना सूनेनं घरात पाडला रक्ताचा सडा, प्रतिक्षाने असं का केलं?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna Crime: पती घरात नसताना जालन्यात एका महिलेने सासूनचा खून केला. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिलीये.
जालना : पती घरात नसताना सुनेनं सासूची निघृण हत्या केली आणि मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, गोणीत भरलेला मृतदेह उचलता न आल्याने एका व्यक्तीसह बुलेटवरून धूम ठोकली. जालन्यातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शन कॉलनीत ही धक्कादायक घटना घडलीये. आज, 2 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बीडमधील गेवराई तालुक्यातील असणारं शिनगारे कुटुंब प्रियदर्शन कॉलनीत भाड्याने राहत होते. आकाश संजय शिनगारे यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. खासगी नोकरीनिमित्त ते लातूर येथे राहत असून पत्नी प्रतीक्षा शिनगारे ही सासू सविता शिनगारे यांच्यासह जालन्यात राहत होती. आज पहाटे घडलेल्या या भयंकर घटनेत प्रतिक्षाने सासूचा जीव घेतला आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही.
advertisement
नेमकं घडलं काय?
सून प्रतिक्षा शिनगारे हिने पहाटे आपली सासू सविता हिचे डोके भिंतीवर आपटून खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत कोंबून घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता. मात्र, तिला हे कृत्य पूर्ण करता आले नाही. शेवटी एका व्यक्तीसह ती बुलेटवरून फरार झाली. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
advertisement
सीसीटीव्हीत काय दिसलं?
शिनगारे यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. प्रतिक्षा ही पहाटे 5:28 वाजता घरातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती एका साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून पळून गेली असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तैनात केली आहेत. ही घटना समोर आल्यानंतर तपास सुरू केला असून प्रतिक्षा आणि तिच्या साथीदाराचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले.
advertisement
परभणीतून केली अटक
या प्रकरणाने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सासू-सुनेतील वादाचे कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सुनेला परभणी येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
jalna Crime: सासू साखर झोपेत असताना सूनेनं घरात पाडला रक्ताचा सडा, प्रतिक्षाने असं का केलं?








