नगरमध्ये शेतकरी दाम्पत्यासोबत घडलं भयंकर, पत्नी शेततळ्यात अन् पती घरात मृतावस्थेत, तोंडातून फेस अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील सादतपुर परिसरात शेतकरी पती-पत्नीचा एकाच दिवशी गूढ मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सादतपुर शिवारातील गायकर वस्तीवर राहणारे ६० वर्षीय रेवजी मुरलीधर गायकर आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी नंदा गायकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नंदा यांचा मृतदेह घराजवळील शेततळ्यात तरंगताना आढळला, तर रेवजी यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आश्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कोणी विष पाजले, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
advertisement
तसेच, नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांच्यासोबत घातपात घडला, याबाबतही संशय निर्माण झाला आहे. या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, स्थानिक नागरिकांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने परिसरात मोठी चर्चा सुरू असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jul 11, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नगरमध्ये शेतकरी दाम्पत्यासोबत घडलं भयंकर, पत्नी शेततळ्यात अन् पती घरात मृतावस्थेत, तोंडातून फेस अन्...









