दुसऱ्या लग्नासाठी बापाने पोटच्या लेकाची दिली सुपारी, मृतदेह आढळल्यानं खळबळ

Last Updated:

दुसरं लग्न करण्यासाठी मुलगा ठरत होता अडसर, बापानं पोटच्या मुलाला संपवलं

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
मेरठ - उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये एका बापाचे भयंकर कृत्य समोर आले आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका निवृत्त लष्करी जवानाने दुसरं लग्न करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला मारलं. त्यांनी सुपारी देऊन आपल्याच मुलाची हत्या करायला लावली. या घटनेने मेरठमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलगा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत होता. त्यामुळे त्यानी पोटच्या मुलाच्याच हत्येची सुपारी दिली. या घटनेतील आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. तसंच मारेकऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
ही घटना मेरठ पोलीस स्टेशन हद्दीतील सरधना परिसरातील आहे. या ठिकाणी निवृत्त सैनिक संजीव आणि त्यांची पत्नी मुनेश यांच्यात गेल्या 15 वर्षांपासून वाद सुरू होते. त्यांचा 27 वर्षांचा सचिन नावाचा एकुलता एक मुलगा होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. सचिनच्या वडिलांना दुसरं लग्न करायचं होतं, पण मुलाचा या लग्नाला विरोध होता. या गोष्टीचा वडिलांना राग आला आणि त्यांनी सचिनला वाटेतून दूर करण्याचा विचार केला.
advertisement
त्यानी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन कॉन्ट्रॅक्ट किलरला कामावर ठेवलं. अमित असं त्या किलरचं नाव आहे. पाच लाखात पित्याने मुलाच्या हत्येची सुपारी दिली. यानंतर सुपारी घेणाऱ्याने प्लॅनिंग करून सचिनला खूप दारू पाजली आणि नंतर त्याचा गळा आवळून खून केला. इतकंच नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो हिंडन नदीत फेकून दिला. मारणाऱ्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी बाईक आणि मोबाईल फोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते.
advertisement
सचिन घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या आईने तो हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे तपास करण्यात आला आणि संजीव यांची चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसंच आरोपी वडील आणि मारेकऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. मेरठ पोलीस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
दुसऱ्या लग्नासाठी बापाने पोटच्या लेकाची दिली सुपारी, मृतदेह आढळल्यानं खळबळ
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement