मॅनेजरकडून महिला सहकाऱ्यांवर अत्याचार,अश्लील Video काढून खंडणी उकळली, पत्नीनेही केली मदत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पाहुणचाराच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध दिल्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण त्याचा पत्नीने केल्याचं उघड झालंय .
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका नराधम मॅनेजरकडून महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केले नाहीत, तर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणीही उकळल्याचे समोर आले आहे.
पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी 34 वर्षीय प्रदीप नामदेव नरळे या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात त्याची पत्नी रेणुका नरळे आणि भाऊ प्रविण नरळे हे दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी नरळे हा अंधेरी येथील एका विमा कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या 32 वर्षीय महिला सहकाऱ्याशी त्याची ऑनलाइन मीटिंगदरम्यान ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 27 मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आलेल्या त्या महिलेला नरळे याने पनवेल येथील आपल्या घरी बोलावले. पाहुणचाराच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध दिल्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण त्याचा पत्नीने केल्याचं उघड झालंय .
advertisement
तब्बल ८ लाख ११ हजार रुपये उकळले
शुद्धीवर आल्यानंतर पीडितेच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करण्यात आली. तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तब्बल ८ लाख ११ हजार रुपये उकळले. पैसे देण्यास विलंब झाल्यानंतर आरोपीने तिला गोव्याला नेऊन पुन्हा अत्याचार केला. याशिवाय, आरोपीच्या भावानेही धमक्या देत ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. अखेर पीडित महिलेने आपले दु:ख पतीसमोर मांडले आणि पोलिसांत धाव घेतली. सुरुवातीला नागपूरच्या सिताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, जी पुढे पनवेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
advertisement
अंधेरी पोलिसांनी कोल्हापूरहून अटक
प्रदीप नरळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई आणि नवी मुंबई येथे बलात्कार, फसवणूक, खंडणी, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. अंधेरी पोलिसांनी कोल्हापूरहून अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून २८ सिमकार्ड आणि पीडित महिलांच्या नावावर काढलेल्या कर्जाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
advertisement
आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता
या प्रकरणात नरळे दाम्पत्याने विमा कंपनीतील अनेक महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले असल्याचा संशय आहे. बदनामीची भीती आणि धमक्यांमुळे अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र पोलिसांनी महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले असून, त्यांच्या माहितीचे पूर्ण गुप्तता राखली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मॅनेजरकडून महिला सहकाऱ्यांवर अत्याचार,अश्लील Video काढून खंडणी उकळली, पत्नीनेही केली मदत


