Mumbai Crime: 'कुणासोबतही शरीर संबंध ठेवणे त्याला आवडत नव्हतं' रिटा संतापली अन्...,मुंबईतील सिनेस्टाईल घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बारबालाच्या खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या आणि तिच्यावर जास्त अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीची बारबालाने हत्या केली आहे. त्या व्यक्तीच्या स्वभावाला कंटाळून तिने थेट त्याची हत्याच केली आहे.
मुंबईतील बोरिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वभाव न पटल्यामुळे बोरिवलीमध्ये बारबालाने एका व्यक्तीचीच थेट हत्या केली आहे. बारबालाच्या खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या आणि तिच्यावर जास्त अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीची बारबालाने हत्या केली आहे. त्या व्यक्तीच्या स्वभावाला कंटाळून तिने थेट त्याची हत्याच केली आहे. हत्या करण्याचा कट रचला, बोरिवलीत त्याच्यावर चाकूने अमानुष हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारबाला रिटा आणि तो व्यक्ती जेव्हापासून अंधेरीमध्ये भेटलेय, तेव्हापासून ते अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगलेच ओळखत होते. त्या दोघांचीही पहिली भेट अंधेरीतल्या एका बारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. "26 डिसेंबर रोजी पहाटे बोरिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 03 च्या बाहेर 44 वर्षीय रियल इस्टेट व्यावसायिकावर त्या व्यक्तीने चाकून हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. बारबाला त्या व्यक्तीच्या पोटात दोनदा आणि हातावर एक वार केला. त्याला मृत समजून ती बारबाला घटनास्थळावरून पळून गेली," असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
हल्ल्यानंतर, जखमी व्यक्तीने बोरिवली पोलिस स्टेशन गाठले, त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चौकशीदरम्यान असे दिसून आले की, बारबाला रिटा तिच्या व्यवसायामुळे अनेक लोकांना ओळखत होती. याचा त्याला फार राग येत होता. तो तिला इतर कोणत्याही माणसाला भेटून देत नव्हता, तिने इतर कोणासोबतही शरीर संबंध ठेवलेले त्याला आवडत नव्हतं. या गोष्टीसाठी तो तिला दबाव आणायचा. ज्यामुळे त्या दोघांमध्येही वारंवार वाद होत होते.
advertisement
जेव्हा त्या व्यक्तीला बारबाला रिटाचे परपुरूषाशी जवळचे संबंध आहेत, असं कळलं. तेव्हा त्याने त्याला फोन करून तिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवू नको, असं सांगितलं होतं. याचाच राग मनात ठेवून बारबाला रिटाने त्या व्यक्तीवर हल्ला केला. बारबाला रिटाने मनात राग ठेवून, रिटाने तिच्या चुलत भावाला आणि इतर दोघांना त्याला मारण्यास सांगितले. त्या तिघांनीही त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. दरम्यान, पोलिसांनी त्या व्यक्तीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी बारबाला रिटासह तिच्या चुलत भावावर आणि त्याच्या अन्य साथीदारांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 9:49 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai Crime: 'कुणासोबतही शरीर संबंध ठेवणे त्याला आवडत नव्हतं' रिटा संतापली अन्...,मुंबईतील सिनेस्टाईल घटना











