बहिणीशी बोलताना अचानक फोन कट झाला अन्... नंदुरबारमध्ये सोनाराचं रहस्यमयरित्या अपहरण

Last Updated:

सराफा दुकानाकडे जाण्यास निघालेल्या सोनाराचे रहस्यमयरीत्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
निलेश पवार, प्रतिनिधी
नंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून म्हसावद येथील सराफा दुकानाकडे जाण्यास निघालेल्या सोनाराचे रहस्यमयरीत्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहादा शहरात राहणारे सोनार रितेश जयप्रकाश पारेख हे सोमवारी सकाळी आपल्या घरातून दुकानासाठी निघाले होते. ते जीजे बीई ७९३५ क्रमांकाच्या एक्स यूव्ही थ्री हंड्रेड कारमधून म्हसावद येथील त्यांच्या सराफा दुकानाकडे रवाना झाले होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पाडळदा ते बुडीगव्हाण या दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना रितेश आपल्या बहिणीशी मोबाईलवरून संवाद साधत होते. संभाषण सुरू असतानाच अचानक त्यांच्या बोलण्यात बदल जाणवला आणि काही क्षणांतच त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. या घटनेनंतर बहिणीला संशय आला आणि तिने तातडीने घरच्यांना याबाबत माहिती दिली.

अपहरणाची शक्यता व्यक्त

कुटुंबीयांनी तातडीने चौकशी सुरू केली असता, रितेश पारेख हे म्हसावद येथील दुकानावर पोहोचलेच नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या अपहरणाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि शहादा सराफा असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले.
advertisement

नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन

पोलीसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली असून, पाडळदा ते बुडीगव्हाण या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारेही पोलिसांचा तपास सुरू आहे. अपहरणामागे आर्थिक कारण, ओळखीतील व्यक्तींचा सहभाग की इतर काही हेतू, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटना समोर आल्यानंतर शहादा शहरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, संबंधित सराफ सापडल्यावर घटनेचा उलगडा होणार आहे.
advertisement

कामावरुन काढल्याने पुण्यातील ठेकेदाराच्या चिमुरडीचे अपहरण 

काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने कामावरुन काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. ही बाब समजताच विमानतळ पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. ते इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याचे समजल्यावर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करुन मुलीची सुटका करण्यात आली. चौघे जण बिहारकडे चालले होते. जवळपास चार तासांच्या प्रयत्नानंतर हे अपहरणकर्ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
बहिणीशी बोलताना अचानक फोन कट झाला अन्... नंदुरबारमध्ये सोनाराचं रहस्यमयरित्या अपहरण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement